Sunita Williams ना अंतराळातून पृथ्वीवर परतणं कितपत शक्य? राहिले फक्त इतके दिवस, आता NASA कडे काय पर्याय?

| Aug 04, 2024, 14:35 PM IST
1/8

Sunita Williams ना अंतराळातून माघारी येणं कितपत शक्य? राहिले फक्त इतके दिवस, आता NASA कडे काय पर्याय?

Sunita Williams Possibility return from space NASA Options world Marathi News

Sunita Williams: नासाच्या भारतीय मूळच्या अंतराळयात्री सुनिता विलियम्स आपले साथी बेरी विल्मोर यांच्यासोबत 2 महिन्यांपासून अंतराळात अडकल्या आहेत. हे दोघेही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) मध्ये आहेत. अंतराळ यान बोईंग स्टारलायनमध्ये बिघाड झाल्यानंतर दोन्ही अंतराळ यात्री परतू शकले नाहीत. आता नासाकडे या दोघांना परत आणण्यासाठी खूप कमी वेळ राहिलाय. 

2/8

2 महिन्यांपासून अंतराळात अडकले

Sunita Williams Possibility return from space NASA Options world Marathi News

दोन्ही अंतराळयात्री बोइंग स्टारलायनरमधून 5 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले.त्यांचे हे मिशन खरतरं 8 दिवसांचेच होते. पण हीलियम लिक आणि थ्रस्टरमध्ये बिघाड झाल्याने आंतराळ यात्रींचे माघारी परतणे टाळण्यात आले. बोईंग स्टारलायनरचे हे पहिले उड्डाण होते. सुनिता विलियम्स आणि बेरी विल्मोर हे साधारण 2 महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. आता नासाकडे ही समस्या दूर करण्यासाठी केवळ 16 दिवस राहिले आहेत. 16 दिवसांनंतर क्रू-9 मिशन येणार आहे. 

3/8

का झाला होता बिघाड?

Sunita Williams Possibility return from space NASA Options world Marathi News

फ्लोरिडाच्या कॅप कॅनावेरल स्पेस फोर्स स्टेशनमधून बोईंग स्टारलायन दोघा अंतराळयात्रींना घेऊन अंतराळात गेले होते. हे मिशन बोइंग स्टारलायनरचे पहिले मानवी उड्डाण होते. अंतराळ यान आयएएसएसशी यशस्वीरित्या जोडले गेले. पण जवळ पोहोचता पोहोचता 28 थ्रस्टर्समधील 5 बंद झाले. याच्या इंजिनिअर्सना अंतराळ यानातील सर्व्हिल मॉड्यूलमधील 5 छोट्या हीलीयम लीकबद्दल कळाले. या कारणामुळे बोइंग ,स्टारलायन अनडॉक होऊन पृथ्वीवर परतू शकत नाही.

4/8

कोणती तारीख?

Sunita Williams Possibility return from space NASA Options world Marathi News

अमेरिकी अंतराळ संस्था नासा आणि बोईंगचे इंजिनीअर अंतराळ यानामधील बिघाड दूर करण्याचा आतोनात प्रयत्न करत आहेत. पण आतापर्यंत नासाच्या अंतराळ यात्रींना परत आणण्याची कोणती तारीख सांगण्यात आली नाहीय. 

5/8

तर अंतराळ यात्रींसाठी धोका

Sunita Williams Possibility return from space NASA Options world Marathi News

दोघे पृथ्वीवर परतण्यात अंतराळ यानाचे थ्रस्टर आणि हेलियम सिस्टमची महत्वाची भूमिका आहे.बोइंग स्टारलायनरमध्ये कोणता बिघाड आला तर यामुळे अंतराळ यात्रींसाठी धोका निर्माण होऊ शकतो.

6/8

आता होईल ही अडचण

Sunita Williams Possibility return from space NASA Options world Marathi News

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी क्रू-9 मिशन लवकरच लॉन्च केले जाणार आहे. हे अंतराळ स्थानकाशी जोडण्यासाठी आधी स्टारलायनरला डार्किंग पार्टपासून वेगळे करावे लागेल. यामुळे स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. क्रू 9 मिशन 18 ऑगस्टच्या आधी लॉंच होऊ शकते.

7/8

अंतराळात घेऊन जाणार

Sunita Williams Possibility return from space NASA Options world Marathi News

स्पेस एक्सचे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट अंतराळ यात्री जेना कार्डमन, निक हेग आणि स्टेफनी विल्सन यांच्यासोबत रोस्कोस्मोसचे अंतराळ यात्री अलेक्झेंडर गोर्बुनोव यांना अंतराळात घेऊन जाणार आहे. 

8/8

6 डार्किंग पोर्ट

Sunita Williams Possibility return from space NASA Options world Marathi News

बोइंग स्टारलायनरप निष्क्रिय झाले तर विलियम्स आणि विल्मोर यांना पृथ्वीवर आणण्यासाठी नव्या पद्धतींचा विचार करावा लागणार आहे. अशावेळी स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सूलचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. अंतराळ स्थानकात 6 डार्किंग पोर्ट आहेत. ज्याचा उपयोग नासा करु शकते.