तब्बल 16 वर्षे शाहरुख- सनीचं वैर! चित्रपटमध्ये एकत्र काम न करण्याची घेतली होती शपथ, मग पुढे...

Sunny Deol Birthday : बॉलिवूडमध्ये अनेक किस्से आहेत, प्रेमापासून भांडणापर्यंत बॉलिवूडमधील टॉपचे अभिनेते शाहरुख खान आणि सनी देओल तब्बल 16 वर्षे एकमेकांशी बोलले नव्हतं. एका प्रसिद्ध आणि सुपरहिट चित्रपटामुळे त्यांच्यामध्ये वैर झालं होतं. 

| Oct 19, 2024, 15:14 PM IST
1/11

बॉलिवूडचा 'अँग्री यंग मॅन' सनी देओल आज त्याचा 68 वा वाढदिवस आहे. 19 ऑक्टोबर 1957 रोजी जन्मलेल्या सनीने आपल्या करिअरमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. पण त्याच्या आयुष्यातही अशा काही घटना घडल्या, ज्यामुळे इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. प्रेम प्रकरण असो किंवा मैत्री आणि वैर असो, तो जे काही करायचा त्यामुळे तो गाजला. 

2/11

अशीच एक घटना शाहरुख खान आणि सनी देओलची आहे, हे दोघे एकमेकांशी तब्ब्ल 16 वर्ष बोलले नव्हते. एवढंच नाही तर, त्यांनी एकत्र काम न करण्याचा निर्णयही घेतला होता. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या. 

3/11

हा किस्सा आहे, 1993 मधील..., जेव्हा यश चोप्रांनी सनी देओलला त्यांच्या सुपरहिट चित्रपट डरमध्ये मुख्य नायक म्हणून कास्ट केले होते. या चित्रपटात शाहरुख खान खलनायकाच्या भूमिकेत होता. तेव्हा शाहरुख इंडस्ट्रीत नवीन होता. सनी देओल त्यावेळी प्रसिद्ध अभिनेता तर होताच त्याच्या नावावरचे चित्रपट हिट व्हायचे. 

4/11

पण जसजसे डर चित्रपटाचे शूटिंग पुढे जात होते तसतसे सनीला वाटू लागले की चित्रपटात नायकापेक्षा खलनायकाच्या भूमिकेला जास्त महत्त्व दिलं जातंय. यामुळे सनी चांगलाच संतापला. यानंतर अनेक गोष्टी घडल्या ज्या या दोघांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झाला. 

5/11

डर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुख खानने खलनायक असूनही या चित्रपटात अधिक लोकप्रियता मिळवली. तर सनी देओलला खूप वाईट वाटलं आणि त्याने ठरवले की तो यश चोप्रा किंवा शाहरुख खानसोबत पुन्हा कधीही काम करायचं नाही. या रागामुळे सनीने 16 वर्षे शाहरुख खानशी एकमेकांशी बोलले नाहीत. 

6/11

असं म्हटलं जातं की, चित्रपटाच्या सेटवरही सनीला सारखा राग यायचा पण तो व्यक्त करता येत नव्हता. एकदा त्याने रागाने खिशात हात घातला तर तो खिशा फाटला. हे पाहून सेटवरील लोक घाबरली होती.   

7/11

डरच्या सेटवरही सनी देओलचे शाहरुख खानसोबत भांडण झाली होती, असं सेटवरील लोक सांगायचे. सनीला वाटले की नायक असूनही त्याला चित्रपटात कमी महत्त्व दिलं जात आहे. याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. या भांडणानंतर सनीने शाहरुख खानशी बोलणेच थांबवले नाही तर यश चोप्रासोबत कधीही काम न करण्याची शपथही घेतली.

8/11

मात्र, काही वर्षांनंतर सनी देओलने फिल्मफेअरच्या एका मुलाखतीत या प्रकरणावर आपले मौन सोडलं. शाहरुख खान आणि अनिल कपूरसोबत पुन्हा काम करणार का, असा प्रश्न सनीलाविचारण्यात आला. यावर सनीने सांगितले की, त्या दोघांसोबत यापूर्वीही काम केले आहे आणि ते किती सक्षम आहेत हे मला माहीत आहे. मात्र, आता आपण अधिक सावध राहणार असल्याचेही सनीने पुढे म्हणाला. 

9/11

त्यानंतर 16 वर्षांनंतर शाहरुख आणि सनी एकत्र दिसले. एवढं नाही तर एकमेकांना मिठी मारली. झालं असं की, 'गदर 2' च्या सक्सेस पार्टीचे आयोजन सनी देओलने केली होती. त्याने शाहरुख खानला या पार्टीसाठी आमंत्रण दिलं. तोही खास या पार्टीसाठी उपस्थितीत झाला. इतकंच नाही तर त्या दोघांना पापाराझींसमोर एकत्र पोज देत फोटो देखील काढले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत होता. 

10/11

शाहरुख खानसोबत भांडण करूनही सनी देओल इंडस्ट्रीत त्याच्या मैत्रीसाठी ओळखली जाते. खासकरून जेव्हा सलमान खानला त्याच्या करिअरमधील कठीण टप्प्यातून जावं लागलं तेव्हा सनीने त्याला महत्त्वाचा सल्ला दिला. 90 च्या दशकात सलमानचे करिअर डबघाईला आलं होतं तेव्हा सनीने त्याला योग्य दिशा दाखवली होती. सनीच्या सल्ल्यानेच त्याचे करिअर पुन्हा रुळावर आल्याचे खुद्द सलमानने मान्य केलंय. 

11/11

सनी देओलच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने 41 वर्षे आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच्या नुकत्याच आलेल्या गदर 2 या चित्रपटाच्या जबरदस्त यशाने तो पुन्हा एकदा इंडस्ट्रीचा सुपरस्टार बनलाय. आता चाहते त्याच्या पुढच्या बॉर्डर 2 आणि लाहोर 1947 या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.