Adult इंडस्ट्री सोडली, 15 फ्लॉप तरीही कोट्यधींची मालकीण! सनी लियोन आता करते तरी काय?

Sunny Leone Net Worth: बॉलिवूडमधील अभिनेत्री सनी लिओन गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये झळकलेली नाही. तरी अभिनेत्रीकडे कोटींहून अधिक संपत्ती आहे. ती अनेक बिझनेसवुमन असून अनेक व्यवसायातून ती कमाई करते. 

May 13, 2024, 11:44 AM IST
1/12

पूजा भट्टच्या 2012  मधील 'जिस्म 2' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सनी लिओनीचा आज 43 वा वाढदिवस आहे. आज तिच्या करिअरमध्ये तिने खूप मोठा पल्ला गाठलाय. CAknowledge नुसार, ती आता एका प्रोजेक्टसाठी सुमारे 1.2 कोटी घेते. शिवाय या अहवालानुसार तिची एक संपत्ती ही 115 कोटी एवढी आहे. 

2/12

ती अभिनयाशिवाय प्रॉडक्शन हाऊस चालवण्यापासून ते शाकाहारी ऍथलीझर ब्रँडमध्ये गुंतवणूक करण्यापर्यंत आणि सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीग संघाचे मालक बनण्यापर्यंत सनी अनेक व्यवसायात गुंतवणूक करते.   

3/12

सनी लिओनने स्वत:चा 2018 मध्ये कॉस्मेटिक ब्रँड लॉन्च केलाय. यात लिपस्टिक, आयलाइनर्स, हायलाइटर आणि मस्करा मिळतात. यानंतर वर्षभराच्या आता सनी आणि तिचा पती डॅनियल वेबरने इन्फेमस बाय स्टारस्ट्रकसह इनरवेअर उद्योगात प्रवेश करून त्यांच्या ब्रँडचा विस्तार करुन नाव कमावलंय. 

4/12

43 वर्षीय अभिनेत्रीने 2021 मध्ये PETA-मान्यता मिळालेल्या व्हेगन ऍथलीझर ब्रँडमध्येही गुंतवणूक केलीय. या कपड्यांचा ब्रँड नवीन पिढीसाठी 100% सेंद्रिय युनिसेक्स पोशाख तयार करतो असा दावा त्यांनी केलाय. 

5/12

सौंदर्यप्रसाधनांच्या ब्रँडशिवाय, सनीने लस्ट आणि ऍफेटो या दोन नवीन ब्रँडसह फ्रेगरेंस बिझनेसही सुरु केलाय. सनीचा ब्रँड डिओडोरंट, परफ्यूम आणि बॉडी मिस्टची विक्री करतात. 

6/12

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, सनीने ऑनलाइन गेम डेव्हलपमेंट कंपनी गेमयाना डिजिटल एंटरटेनमेंटसोबत 2018 मध्ये 'तीन पत्ती' नावाचा स्वतःचा ऑनलाइन गेम लॉन्च केलाय. 

7/12

सनी सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत. जगरनॉट बुक्स ॲपचे संस्थापक चिकी सरकार यांच्या सहकार्याने अभिनेत्रीने 2019 मध्ये 12 इरोटिस शॉर्ट स्टोरीज (स्वीट ड्रीम्स) लिहून कंटेंट स्पेसमध्येही ती कार्यरथ आहे. 

8/12

मिड-डेच्या वृत्तानुसार, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात युनायटेड स्टेट्सला रवाना होण्यापूर्वी, लिओनने यूके-आधारित आयपीएल सॉकर संघात भागभांडवल विकत घेतलंय. 

9/12

इकॉनॉमिक टाइम्सनुसार, 2021 मध्ये डिजिटल मालमत्तेत गुंतवणूक करणारी सनी लिओनी पहिली भारतीय अभिनेत्री आहे. तिने स्वतःची एनएफटी देखील निर्माण केलीय.

10/12

2019 हे वर्ष लिओनसाठी खूप खास असून तिने ऑनलाइन मीडियासह अनेक उद्योगांमध्ये प्रवेश करून तिचा व्यवसाय पोर्टफोलिओ जबरदस्त वाढवली आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, सनी महिलांच्या फॅशन आणि लाइफस्टाइल वेबसाइट हॉटरफ्लायमध्ये इक्विटी गुंतवणूकदार आहे. 

11/12

ती अनेक रिॲलिटी शोमध्ये भाग असून ती ते होस्टही करते. ती सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीग संघाची (चेन्नई स्वॅगर्स) मालक असून एकता कपूर - समर्थित रिॲलिटी क्रिकेट टूर्नामेंटमध्ये उत्तम कामगिरी केलीय.   

12/12

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, सनी लिओनीने 2015 मध्ये पती डॅनियल वेबरसोबत सनसिटी मीडिया अँड एंटरटेनमेंट हे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केलंय. या कंपनीत ती निर्मात्याची भूमिकेत असते. टॅलेंट मॅनेजमेंटसह त्यांनी हा व्यवसायाचा विस्तारही केलाय.