Surya Gochar: दहा दिवसानंतर या राशींना मिळणार सूर्यबळ, तुमची रास आहे का? वाचा

Surya Gochar In Dhanu 2022: प्रत्येक महिन्यात सूर्य आपली राशी बदलतो. त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. 16 डिसेंबर रोजी सकाळी 9.38 वाजता सूर्य वृश्चिक राशीतून निघून धनु राशीत प्रवेश करेल. धनु राशीत सूर्याच्या गोचरामुळे काही राशींना विशेष फायदा होईल, तर काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. चला जाणून घेऊयात...

Dec 05, 2022, 18:58 PM IST
1/5

surya gochar 2022

ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या शुभ स्थानात सूर्याचे गोचर होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. त्याचबरोबर वैवाहिक जीवनातही आनंद मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही गोचर फायदेशीर ठरणार आहे.  

2/5

ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीचा सूर्य स्वामी आहे. हे गोचर या राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे. दीर्घकाळ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायातही यावेळी यश मिळेल.

3/5

surya gochar 2022

या राशीच्या सहाव्या घरात सूर्याचे भ्रमण होणार आहे. अशा परिस्थितीत कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ आणि फलदायी असणार आहे. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि पदोन्नती मिळेल. 

4/5

surya gochar 2022

ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीच्या सातव्या घरात सूर्याचे भ्रमण होणार आहे. भागीदारीत केलेल्या व्यवसायात या काळात अनेक पटींनी अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील.

5/5

surya gochar 2022

ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांच्या संक्रमण कुंडलीत नवव्या भावात सूर्याचे संक्रमण होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्यांना समाजात मान-सन्मान मिळेल. या दरम्यान बराच काळ रखडलेले काम मार्गी लागेल.