IPL 2024 : सूर्या करणार कमबॅक; प्लेईंग 11 मधून 'या' खेळाडूचा पत्ता होणार कट?

Mumbai Indians IPL 2024 : हार्दिक पांड्याचा नेतृत्वाखाली यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सची अवस्था फारशी चांगली नाहीये. आयपीएलमध्ये सलग 3 सामने गमावले असून ताज्या पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे.

| Apr 04, 2024, 19:20 PM IST
1/7

मुंबई इंडियन्सच्या टीमने अजून एकंही विजय मिळवलेला नाही. अशातच एक चांगली बातमी समोर येतेय. 

2/7

लवकरच स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव मुंबईच्या टीममध्ये सामील होणार आहे. यामुळे पुढील सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तो देखील सामील होण्याची शक्यता आहे.

3/7

NCA कडून सूर्या मंजुरी देण्यात आलीये. तो आता मुंबईच्या टीमसह आयपीएलमध्ये सामील होऊ शकतो.

4/7

सूर्या टीममध्ये आल्यास तो तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे.

5/7

त्यामुळे आता प्रश्न असा आहे की, सूर्याचं कमबॅक झाल्यानंतर टीममधून बाहेरचा रस्ता कोणत्या खेळाडूला दाखवला जाणार?

6/7

मुंबई इंडियन्सकडून आतापर्यंत झालेल्या 3 सामन्यांमध्ये नमन धीर तिसऱ्या क्रमांकावर खेळला. त्यामुळे त्याला ही जागा गमवावी लागू शकते.

7/7

यामुळे आगामी सामन्यात मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये हा बदल पहायला मिळू शकतो.