India Vs Bangladesh : Team India चे 'हे' पाच खेळाडू संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचवणार!

Ind Vs Ban, T20 World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ आज (२ नोव्हेंबर) बांगलादेशविरुद्ध महत्त्वपूर्ण सामना खेळणार आहे. हा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आहे. हा सामना जिंकूल्यानंतर टीम इंडियाला सेमी फायनलचे दरवाजे उघडू शकतात. भारताकडे असे पाच खेळाडू आहेत जे टीम इंडियाला सामना जिंकून देऊ शकतात. जाणून घेऊया या खेळाडूंबद्दल...

Nov 02, 2022, 10:53 AM IST
1/5

सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे. T20 विश्वचषकात (t20 world cup 2022) त्याने नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध  शानदार अर्धशतके झळकावली. चौफेर फटकेबाजी करण्यात हातखंडा असलेला सूर्यकुमार बांगलादेशविरुद्ध (Bangladesh ) टीम इंडियासाठी ट्रम्पकार्ड ठरू शकतो. भारताचा एबी डिव्हिलियर्स म्हणतात. 

2/5

विराट कोहलीची (virat kohli) गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध केलेल्या शतकी खेळीनंतर विराट कोहली फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला होता. अशा स्थितीत भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध विजय मिळवू शकतो.

3/5

भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) 2022 च्या T20 विश्वचषकात अप्रतिम गोलंदाजी केली आहे. जबरदस्त आणि किफायतशीर गोलंदाजी केली आहे. ज्यामुळे इतर गोलंदाजांना विकेट मिळवणे सोपे झाले. तो T20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. 

4/5

हार्दिक पांड्या (hardik pandya) किलर बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये निष्णात खेळाडू आहे. गेल्या टी-20 वर्ल्डकपनंतर संघाबाहेर गेलेल्या हार्दिक पांड्याने अल्पावधीतच पुनरागमन केलं आहे. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात छाप पाडली आहे. आता बांगलादेशविरुद्धही त्याच्याकडून अशाच धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा असेल.  

5/5

अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) 2022 च्या टी20 विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे. त्याने 3 सामन्यात 7 बळी टिपले आहेत. तसेच त्याची गोलंदाजीही किफायतशीर झाली आहे. आता बांगलादेशच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यास तो उत्सुक असेल.