Trending: ''चित्रपटसृष्टीत अभिनयापेक्षा...'', 'या' मराठमोळ्या अभिनेत्यानं सांगितलं पडद्यामागचं भीषण वास्तव

Kailas Waghmare: कलाकार आता सोशल मिडियावरून स्पष्टपणे व्यक्त होताना दिसत आहेत. त्यामुळे कलाकार त्यांचे म्हणणे हे त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत (Celebrity on Social Media) पोहचवू शकत आहेत. अभिनेतो कैलास वाघमारंनंही (Kalias Waghmare instagram) आपल्या अनुभवाविषयी काही गोष्टी शेअर केल्या आहेत. 

Mar 08, 2023, 22:36 PM IST

Kailas Waghmare: आपल्या मिळालेल्या वागणूकीबद्दल अनेक कलाकार उघडपणे बोलताना दिसत आहेत. सध्या अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्यानं (celebrity) यावर वाच्यता फोडली आहे. त्यानं नक्की काय म्हटलं हे जाणून घेणं गरजेचे झाले आहे. 'तान्हाजी' (Tanhaji Movie) चित्रपटात झळकलेला अभिनेता कैलास वाघमारे सध्या चर्चेत आहे. 

1/6

Trending: ''चित्रपटसृष्टीत अभिनयापेक्षा...'', 'या' मराठमोळ्या अभिनेत्यानं सांगितलं पडद्यामागचं भीषण वास्तव

kailash waghmare

अनेकदा चित्रपट तसेच मालिकासृष्टीत वर्णभेद आहे आणि त्यामुळे आपल्यालाही त्याचा त्रास सहन करावा लागतो असं सांगणारे अनेक कलाकार आपली मतं मांडताना दिसत आहेत. त्यातून आता अशाच एका कलाकारानं याबद्दल आपलं एक वक्तव्य समोर आणलं आहे. 

2/6

Trending: ''चित्रपटसृष्टीत अभिनयापेक्षा...'', 'या' मराठमोळ्या अभिनेत्यानं सांगितलं पडद्यामागचं भीषण वास्तव

kailash waghmare chultya

अभिनेता कैलास वाघमारे यानं आपल्याला आलेल्या या अनुभवीविषयी सांगितले आहे. 'तान्हाजी' या बॉक्स ऑफिस गाजलेल्या चित्रपटात त्यानं चुलत्याची भुमिका केली होती. त्याचबरोबर 'शिवाजी अन्डरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' हेही त्याचे गाजलेले नाटक होते. 

3/6

Trending: ''चित्रपटसृष्टीत अभिनयापेक्षा...'', 'या' मराठमोळ्या अभिनेत्यानं सांगितलं पडद्यामागचं भीषण वास्तव

kailash waghmare instagram

कैलासनं यावेळेस आपली व्यथा मांडली आहे. आपल्याला आलेल्या काही कटू अनुभवांचा त्यानं जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तो एका मुलाखतीत म्हणतो, सिनेसृष्टीमध्ये एखाद्या वक्तीच्या वागण्यावरून त्याच्याशी कसं वागावं हे ठरवलं जातं. ही गोष्ट माझ्या मनाला चटकावू जातो. त्यांना अभिनय दिसत नाही का अशी खंत त्यानं व्यक्त केली. 

4/6

Trending: ''चित्रपटसृष्टीत अभिनयापेक्षा...'', 'या' मराठमोळ्या अभिनेत्यानं सांगितलं पडद्यामागचं भीषण वास्तव

kailash waghmare movies

एखाद्या मालिकेमध्ये किंवा चित्रपटामध्ये काम देताना काही लोकं तु्म्हाला वेगळ्या नजरेतनं पाहतात. मी भाषेच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की, तुमची भाषा समोरच्या व्यक्तीला तेव्हाच कळते जेव्हा तुम्ही तुमचं तोंड उघडता. पण जेव्हा तोंड उघडण्याआधी तुम्हाला जज केलं जातं, तेव्हा त्याचं काय करायचं? 

5/6

Trending: ''चित्रपटसृष्टीत अभिनयापेक्षा...'', 'या' मराठमोळ्या अभिनेत्यानं सांगितलं पडद्यामागचं भीषण वास्तव

kailash waghmare news

मला तर पाहिल्याबरोबरच माझी विभागणी एका कॅटगरीत केली जाते. हा कोणत्या तरी एका विशिष्ट जातीचा असणार किंवा हा गावाकडचा असणार. याचाच अर्थ याला काहीच येत नसणार. त्यानंतर मात्र तुम्हाला तसं ट्रीट करणं सुरु होतं, असंही त्यानं सांगितले.

6/6

Trending: ''चित्रपटसृष्टीत अभिनयापेक्षा...'', 'या' मराठमोळ्या अभिनेत्यानं सांगितलं पडद्यामागचं भीषण वास्तव

kailash waghmare marathi

आपल्याला परिस्थितीनं गंभीर राहायला शिकवलं असंही तो आवर्जून म्हणतो. 'हाफ तिकीट', 'भिरकीट' आणि गाजलेल्या अनेक मराठी चित्रपटातून त्यानं अभिनय केला आहे. त्याचा 'गाभ' हा मराठी चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होतो आहे.