Google Payवरुन मोबाईल रिचार्ज करणं महागणार! द्यावे लागणार 'एक्स्ट्रा पैसे'

तुम्ही जर गुगल पे वापरत असाल तर तुमच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. कारण आता तुम्हाला गुगल पे द्वारे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे. आत्तापर्यंत गुगल पेद्वारे मोबाईल रिचार्ज पूर्णपणे मोफत होतं. पण आता असं होणार नाही. यामध्ये आता जीएसटीचाही समावेश करण्यात आला आहे.

Nov 23, 2023, 17:33 PM IST
1/7

G pay user

भारतातील Google Pay युजर्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. गुगल पे मोबाईल रिचार्जसाठी वेगळे पैसेही आकारले जाणार आहेत.

2/7

G pay extra charge

आतापर्यंत गुगल पेद्वारे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागत नव्हते. पण आता रिचार्ज करताना तुम्हाला अधिकचे पैसे भरावे लागणार आहेत.

3/7

PhonePe

मात्र गुगलने अद्याप आपल्या पेमेंट अॅपवर सुविधा शुल्क आकारण्याबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही. PhonePe आणि Paytm आधीच मोबाइल रिचार्जसाठी अतिरिक्त शुल्क आकारत आहेत.

4/7

G pay recharge

जेव्हा इतर कंपन्यांनी रिचार्जसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात केली तेव्हा गुगलने सांगितले होते Google Pay वर मोबाइल रिचार्ज नेहमीच मोफत असेल. यासाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही.

5/7

Google pay

Gadgets 360 च्या वृत्तानुसार, कंपनी 749 रुपयांच्या प्लॅनवर 3 रुपये प्लॅटफॉर्म शुल्क आकारणार आहे. गुगल रिचार्ज पॅकनुसार वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शुल्क आकारत आहे. हे शुल्क पेमेंटनुसार 1 रुपये ते 5 आणि 6 रुपये असणार आहे.

6/7

g pay mobile recharge

तसेच या अंतर्गत शून्य ते 100 रुपयांच्या रिचार्जवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 101 ते 200 रुपयांच्या रिचार्जवर 1 रुपये सुविधा शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे.

7/7

electricity bill

माध्यमांच्या वृत्तानुसार, गुगल पेवर इतर व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे वीज बिल आणि इतर रिचार्ज पूर्णपणे मोफत आहेत.