WhatsApp : आता इंटरनेटशिवाय वापरा व्हॉट्सअ‍ॅप, जाणून घ्या कसे?

WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅपने नव्या वर्षात युजर्सना अनेक सुविधा देत नवे फिचर्स आणले आहेत. यामध्ये आता तुम्हाला इंटरनेटशिवाय व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार आहे. 

Jan 06, 2023, 16:57 PM IST
1/5

Android

आता तुम्ही इंटरनेट नसतानाही व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करू शकता. कंपनीने स्वतः याबाबत ट्विट करून याची माहिती दिली आहे. हे फीचर Android आणि iOS या दोन्ही युजर्ससाठी आजपासूनच उपलब्ध झाले आहे. 

2/5

whatsapp Proxy

व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या जगभरातील युजर्ससाठी Proxy Support आणलं आहे. यातून आता तुम्हाला इंटरनेटशिवाय चॅटिंग करता येणार आहे.

3/5

WhatsApp

त्यामुळे आता तुमच्या मोबाईल फोनमध्ये किंवा तुमच्या परिसरात इंटरनेट नसले तरी तुम्ही चॅटिंग करु शकता. प्रॉक्सी सपोर्टच्या मदतीने इंटरनेटशिवायही व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे.

4/5

Proxy Support

यासाठी तुमच्याकडे व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन व्हर्जन असणे आवश्यक आहे. त्यानंतर सेटिंगमध्ये गेल्यावर तुम्हाला Storage and Data हा ऑप्शन दिसेल. त्यामध्ये तुम्हाला Proxy वर ऑप्शन सिलेक्ट करावे लागेल. या फीचरच्या मदतीने व्हॉट्सअॅप युजर्स प्रॉक्सी सर्व्हर सेटअपद्वारे कनेक्ट राहणार आहे.

5/5

WhatsApp End to end encrypted

महत्त्वाची बाब म्हणजे या फिचर्समुळे तुम्हाला तुमच्या गोपनीयतेबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल चिंता करण्याची गरज नाही. कंपनीच्या मते, या फिचरमध्ये मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील. कोणीही तुमचे मेसेज वाचू शकणार नाही.