तेजश्री प्रधानसारखं मनमोहक सौंदर्य हवंय, मग या 7 टिप्स करा फॉलो

अभिनयाप्रमाणेच तेजश्री तिच्या मोहक सौंदर्यामुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरते.  तेजश्रीच्या सौंदर्याचं ब्युटी सिक्रेट जाणून घेऊयात...   

Apr 10, 2024, 19:00 PM IST

मराठी मालिका आणि सिनेमा विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने आतापर्यंत साकारलेल्या विविध भुमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. 

1/8

शिस्त

आयुष्यात कोणतंही ध्येय साध्य करण्यासाठी शिस्त असणं महत्त्वाचं आहे. शिस्तप्रिय व्यक्ती त्याच्या आयुष्यातील अडचणींवर मात करत स्वप्नं पूर्ण करते, असं तेजश्री सांगते.  

2/8

योगा आणि व्यायाम

तेजश्री न चुकता दररोज योगा आणि व्यायाम करते. शारीरिक आणि मानसिकरीत्या निरोगी राहण्यासाठी योगा आणि व्यायाम फार महत्त्वाचा आहे. 

3/8

वेगवेगळ्या भूमिका साकारताना तुमचं कामावर लक्ष असणं गरजेचं आहे. योगा आणि व्यायाम तुम्हाला फिट राहण्यास मदत करतात. 

4/8

संतुलित आहार

मनमोहक हास्य आणि सौंदर्यातील साधेपणा यामुळे तेजश्रीला कायमच प्रेक्षकांची पसंती मिळते. वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यक्तिरेखा साकारताना तुम्ही शारीरिकरीत्या तंदुरुस्त असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी तेजश्री घरच्या जेवणाला जास्त महत्त्व देते.

5/8

फळांचा ज्यूस

सतत बाहेर शुटींगमध्ये असल्याने वातावरणातील प्रदुषणाने त्वचेच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्वचेचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी तेजश्री फळांचा ज्यूसचा आहारात समावेश करते. 

6/8

आनंदी राहणं

एका कलाकाराला रोज वेगवेगळ्या आव्हानाला सामोरं जावं लागतं, त्यामुळे मानसिक आरोग्य स्थिर असेल तरच कॅमेऱ्यासमोर छान काम करता येते. म्हणूनच कोणताही ताण न घेता काम करणं गरजेचं आहे.   

7/8

छंद जोपासणं

स्वत:ला वेळ देणं आणि स्वत:कडे लक्ष देणं महत्वाचं आहे. तेजश्री शुटींग व्यतिरिक्त मोकळ्या वेळेत गाणी ऐकणं, पुस्तकं वाचणं आणि फिरायला जाणं पसंत करते. 

8/8

आत्मविश्वास आणि शिकण्याची तयारी

तेजश्री म्हणते की, तुमचा स्वत: वर विश्वास असला की तो तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतं. मेकअप पेक्षा ही तुमच्या आत्मविश्वासामुळे तुमचं सौंदर्य खुलून दिसतं. त्याचं बरोबर वाईट परिस्थितीतून शिकण्याची तयारी तुम्हाला यशास्वी होण्यास मदत करते.