लग्न न करता 100 हून अधिक मुलांचा बाप, 12 देशात पसरलाय परिवार, टेलीग्राम CEO बद्दलच्या 'या' गोष्टी हैराण करणाऱ्या!

टेलिग्राम मेसेजिंग अ‍ॅपचे फाऊंडर आणि सीईओ पावेल दुरोव याच्याबद्दलच्या अनेक माहिती नसलेल्या गोष्टी जगासमोर आल्या आहेत. ज्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकेल. पावेल दुरोव हा लग्न न करता 100 हून अधिक मुलांचा बाप आहे. त्याचा परिवार 12 देशात पसरलाय.

| Aug 25, 2024, 14:04 PM IST

Telegram CEO Doner: टेलिग्राम मेसेजिंग अ‍ॅपचे फाऊंडर आणि सीईओ पावेल दुरोव याच्याबद्दलच्या अनेक माहिती नसलेल्या गोष्टी जगासमोर आल्या आहेत. ज्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकेल. पावेल दुरोव हा लग्न न करता 100 हून अधिक मुलांचा बाप आहे. त्याचा परिवार 12 देशात पसरलाय.

1/9

लग्न न करता 100 हून अधिक मुलांचा बाप, 12 देशात पसरलाय परिवार, टेलीग्राम CEO बद्दल हैराण करणाऱ्या गोष्टी आल्या समोर!

Telegram CEO Pavel durov sperm donor Father of more than 100 children without marriage World Marathi News

Telegram CEO Doner: टेलिग्राम मेसेजिंग अॅपचे फाऊंडर आणि सीईओ पावेल दुरोव यांना अटक करण्यात आली आहे. पॅरीसच्या बॉर्गेट विमानतळावरुन त्यांना ताब्यात घेण्यात आलं.  

2/9

अनेक माहिती नसलेल्या गोष्टी

Telegram CEO Pavel durov sperm donor Father of more than 100 children without marriage World Marathi News

पावेल दुरोव याच्याबद्दलच्या अनेक माहिती नसलेल्या गोष्टी जगासमोर आल्या आहेत. ज्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकेल. पावेल दुरोव हा लग्न न करता 100 हून अधिक मुलांचा बाप आहे. त्याचा परिवार 12 देशात पसरलाय.

3/9

लग्नाशिवाय पावेल कसा बनला 100 मुलांचा बाप?

Telegram CEO Pavel durov sperm donor Father of more than 100 children without marriage World Marathi News

मी एक किंवा दोन नव्हे तर 100 मुलांचा बाप आहे, असा खुलासा टेलीग्रामच्या संस्थापकाने त्यांच्या एका टेलीग्राम पोस्टद्वारे खुलासा केला होता. पावेल दुरोव याच्या टेलिग्राम चॅनेलवर 11.2 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

4/9

हे कसे शक्य आहे?

Telegram CEO Pavel durov sperm donor Father of more than 100 children without marriage World Marathi News

कधीही लग्न न केलेल्या आणि एकटे राहणे पसंत करणाऱ्या व्यक्तीसाठी हे कसे शक्य आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. इतक्या मुलांचा बाप होण्यामागची गोष्टही त्याने पोस्टमध्ये शेअर केली आहे.

5/9

100 पेक्षा जास्त जैविक मुले

Telegram CEO Pavel durov sperm donor Father of more than 100 children without marriage World Marathi News

पॉवेलच्या मते, 15 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या त्यांच्या स्पर्म डोनेशनमुळे हे शक्य झाले आहे.मला 100 पेक्षा जास्त जैविक मुले (biological Childrens) आहेत, असे त्याने म्हटले. 

6/9

पावेल दुरोव स्पर्म डोनर कसा बनला?

Telegram CEO Pavel durov sperm donor Father of more than 100 children without marriage World Marathi News

पावेल दुरोवच्या पोस्टनुसार, '15 वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राला मूल होण्यात अडचण येत होती आणि त्या मित्राने मला शुक्राणू दान करण्याची विनंती केली होती. जेव्हा मी स्पर्म दान करण्यासाठी क्लिनिकमध्ये गेला तेव्हा मला सांगण्यात आले की, माझे शुक्राणू दर्जेदार आहेत आणि मित्राला यासाठी मदत करू शकतात.'

7/9

उच्च दर्जाचे स्पर्म दाते फारच दुर्मिळ

Telegram CEO Pavel durov sperm donor Father of more than 100 children without marriage World Marathi News

सुरुवातीला मी हे हसण्यावारी घेतले आणि खूप हसलो. नंतर त्यांनी मला या गोष्टीचे गांभीर्य सांगितले. आजकाल उच्च दर्जाचे स्पर्म दाते फारच दुर्मिळ आहेत. त्यामुळे अधिकाधिक शुक्राणू दान करणे हे माझे नागरी कर्तव्य होते. जेणेकरून मी अज्ञातपणे जास्तीत जास्त जोडप्यांना मदत करू शकसो, असे ते म्हणाले. 

8/9

कोण आहे पावेल दुरोव?

Telegram CEO Pavel durov sperm donor Father of more than 100 children without marriage World Marathi News

पावेल दुरोव हे 39 वर्षांचे असून रशियन वंशाचे उद्योजक आहेत. त्यांनी 2013 मध्ये टेलिग्रामची स्थापना केली होती. भारतात हे अॅप फार कमी वेळात खूप लोकप्रिय झाले. चॅटसोबतच जास्त एमबीच्या फाइल्स सहजपणे पाठवण्यासाठी यूजर्सचा याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. प्रायव्हसी, एन्क्रिप्शन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जोरदार भर दिल्याबद्दल टेलिग्राम प्लॅटफॉर्मने जगभरात आपली ओळख निर्माण केली. 

9/9

डेटा सुरक्षा एजन्सीना देण्यास नकार

Telegram CEO Pavel durov sperm donor Father of more than 100 children without marriage World Marathi News

दुरोव यांनी ऑगस्ट 2021 मध्ये फ्रेंच नागरिकत्व स्वीकारले. दुरोव हे व्हीकॉन्टाक्टे सोशल नेटवर्कचे संस्थापक देखील आहेत. VKontakte यूजर्सचा डेटा रशियन सुरक्षा एजन्सीना देण्यात त्यांनी नकार दिला. यानंतर त्यांनी 2014 मध्ये रशिया सोडले. नंतर रशियानेही टेलिग्रामवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला. रशियन भाषिक लोक मोठ्या प्रमाणावर टेलिग्राम वापरतात. याद्वारे युक्रेनमधील युद्धाची महत्त्वाची माहिती शेअर केली जात आहे.रशियन सैन्य संपर्कासाठी टेलिग्रामचा वापर करते, असेही म्हटले जाते.