'ती' लोकप्रिय अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

Dec 29, 2019, 08:25 AM IST
1/6

'ती' लोकप्रिय अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

कलाविश्वात गेल्या वर्षभरापासून सुरु झालेली लग्नसराई यंदाच्या वर्षाच्या शेवटपर्यंत सुरुच आहे. सध्याच लग्नसराईचे वारे पुन्हा वाहू लागले आहेत, निमित्त ठरतंय ते म्हणजे एका बिग फॅट पंजाबी वेडिंगचं. हा दिमाखदार विवाहसोहळा आहे, लोकप्रिय अभिनेत्री मोना सिंग हिचा. शुक्रवारी मुंबईत श्याम गोपालन याच्याशी मोनाने लग्नगाठ बांधली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

2/6

'ती' लोकप्रिय अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

गुरुवारी मोनाची मेहंदी पार पडली. यावेळी तिच्या काही खास मित्रमंळींची उपस्थिती पाहायला मिळाली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

3/6

'ती' लोकप्रिय अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

मोनाने तिच्या लग्नसोहळ्यासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने तिच्या लग्नसोहळ्यात घातला होता तसाच मिळताजुळता लेहंगा मोनानेही घातला होता. तर, श्यामने मोनाच्या लेहंग्याला साजेशी शेरवानी घातली होती. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

4/6

'ती' लोकप्रिय अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये नववधूरुपात मोना समोर येताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

5/6

'ती' लोकप्रिय अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

श्याम आणि मोनाच्या विवाहसोहळ्याला त्यांचा मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची उपस्थिती होती. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

6/6

'ती' लोकप्रिय अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूरनेही या विवाहसोहळ्याला हजेरी लावत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)