मायकल जॅक्सनला 150 वर्षे जगायचं होतं, मग कसा झाला मृत्यू? आता बॉडीगार्डने केला खुलासा

आंतरराष्ट्रीय गायक मायकल जॅक्सनच्या मृत्यूला अनेक वर्षे उलटली असताना, नुकतेच त्याच्या बॉडीगार्डनं मायकलच्या मृत्यूचं खरं कारण उघड केलं आहे. 

Aug 30, 2024, 16:45 PM IST

मायकेल जॅक्सन हे नाव ऐकलं नाही असं कोणीच नसेल. आंतरराष्ट्रीय गायक मायकल जॅक्सन मृत्यूच्या एवढ्या वर्षानंतरही आजही ते लोकप्रिय आहेत. त्यांचा जन्म 1958 मध्ये झाला तर लॉस एंजेलिसमध्ये 25 जून 2009 रोजी निधन झाले. त्यावेळी ते अवघे 50 वर्षांचे होते. 

1/7

मायकेलच्या अशा निधनाने त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का बसला होता. तेव्हा त्यांच्या मृत्यूचे कारण प्रोपोफोलचे जास्त सेवन असल्याचे सांगण्यात आले होते. याशिवाय मायकलच्या डॉक्टरांवर त्याच्या हत्येचा आरोप होता. गायकाच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी त्याच्या बॉडीगार्डने मायकलच्या मृत्यूशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 

2/7

1. मायकेल जॅक्सनच्या मृत्यूवर बोलला त्यांचा बॉडीगार्ड

मायकेल जॅक्सनचा बॉडीगार्ड बिल व्हिटफिल्ड हा अनेक वर्षापासून त्यांच्यासोबत काम करत होता. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती. बिल यांनी नुकतेच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण सांगितले आहे. द सनला दिलेल्या मुलाखतीत बिल म्हणाला “मला वाटते की कोणीतरी ही चूक केली आहे? तर हो, मी माझ्या परीने हे समजून घेण्याचा खुप प्रयत्न केला की हे सर्व जाणूनबुजून केले गेले होते का?

3/7

2. मायकेल जॅक्सनच्या मृत्यूचे कारण

बिल पुढे मायकेल जॅक्सनच्या त्या शेवटच्या दिवसांबद्दलही बोलले. त्यांनी सांगितले की, मायकल त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये खूप अशक्त झाले होते. दौरा सुरू होण्यापूर्वी खूप गोष्टी बदलल्या होत्या. त्यांच्या आयुष्यातील बाकीचे लोक आपापल्या कामात खूप व्यस्त होते. आणि त्यादरम्यान मायकेलने गाण्याचा जास्त सरावही सुरू केला होता. मला वाटतं या सगळ्याचा त्यांच्या तब्येतीवर खूप परिणाम होत होता. पण त्यांचा मृत्यू कुणीतरी मुद्दाम घडवून आणला या विचाराने मला काही फरक पडत नाही.

4/7

3. मायकेल जॅक्सन तणावात होते

मायकेल जॅक्सनचा बॉडीगार्ड म्हणाल की, "मला अनेकदा विचारले जाते, त्यांच्या मृत्यूचे कारण काय आहे? आणि यावर मी लोकांना अनेकदा उत्तर दिले आहे. लोकांना त्याच्या आजूबाजूला राहायचे होते आणि त्यातील अनेकांना त्यांच्याकडून काहीतरी हवे होते. त्याच्यावर परिणाम होत होता. ते तणावाखाली होते आणि तणाव धोकादायक असतो." बिल व्हिटफिल्डने मायकेलसोबत 2006 मध्ये काम करायला सुरुवात केली होती. 

5/7

4. मायकेल जॅक्सन यांचे बॉडीगार्ड त्यांच्या लैंगिक छळाच्या आरोपावर बोलले

या मुलाखतीच्या वेळी बिल मायकेलवरच्या लैंगिक छळाच्या आरोपावरही बोलले. त्यांनी सांगितले की, "ते असे नव्हते, मला असे कधीच जाणवले नाही. कोणाला काहीही वाटले तरी मला विश्वास आहे. मायकेलला समजून घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्या जवळ राहणे आवश्यक आहे. आणि मी त्यांच्या जवळंच होतो. त्यामुळे ते असं करू शकत नाहीत. जेव्हाही मी अशा गोष्टी ऐकतो मला अजूनही आश्चर्य वाटतं. मला वाईट वाटतं की स्वतः बद्दल सांगण्यासाठी ते आज नाही. जर ते असते तर लोकांना जास्त चांगल्या प्रकारे समजू शकले असते की ते कोण होते.  

6/7

5. मायकेल जॅक्सन लैंगिक छळावर

बिल शेवटी म्हणाले, "ज्या मायकेलला मी ओळखतो ते कधीही कोणत्या लहान मुलाला दुखवू शकत नव्हते." त्यांनी एकदा सांगितले होते की कोणत्याही लहान मुलाला दुखवण्यापूर्वी ते स्वतः जीव देतील पण असे वागणार नाही. त्यामुळे मला माहित आहे की त्या सगळ्या आरोपांमुळे त्यांना खूप त्रास झाला होता. यामुळे त्यांच्यात खूप बदल झाला.

7/7

6. मायकल जॅक्सनला लैंगिक छळप्रकरणी जामीन मिळाला

1993 मध्ये मायकलवर एका लहान मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. पण 2005 मध्ये त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कारण एफबीआयला त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नव्हते.