'मी मध्यमवर्गीय असून..', 791 कोटींची मालकणी असलेल्या अभिनेत्रीचं विधान; पडली 'ट्रोल'धाड

Cate Blanchett Hollywood ACtress: या अभिनेत्रीने पत्रकारांशी बोलताना नोंदवलेल्या या प्रतिक्रियेमुळे तिच्यावर चौफेर टिका होत असल्याचं दिसत आहे. अनेकांनी तिला तिच्या श्रीमंतीची आणि एकूण संपत्तीची आठवण करुन दिल्याचं पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री कोण आहे? ती नक्की काय म्हणाली जाणून घेऊयात..

| May 24, 2024, 11:51 AM IST
1/12

Cate Blanchett Rs 791 Crore Middle Class

तुमच्या मते मध्यमवर्गीय कुटुंबाची व्याख्या काय आहे? दैनंदिन खर्च वगळल्यानंतरही काही पैसे शिल्लक राहून सुखा समाधानाने जगता येईल इतकी कमाई असलेलं कुटुंब म्हणजे मध्यमवर्गीय असं साधारणपणे म्हणता येईल. मात्र एका अभिनेत्रीची मध्यमवर्गीय कुटुंबाची व्याख्या वेगळीच असल्याची सध्या चर्चा आहे.  

2/12

Cate Blanchett Rs 791 Crore Middle Class

या अभिनेत्रीची सध्या अचानक चर्चा असण्यामागील कारण म्हणजे तिने स्वत:ला मध्यमवर्गीय म्हटलं आहे. आता तुम्हाला वाटेल की यात विशेष काय? तर यामधील विशेष बाब म्हणजे या अभिनेत्रीची संपत्ती तब्बल 95 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 791 कोटी रुपये इतकी आहे.

3/12

Cate Blanchett Rs 791 Crore Middle Class

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय तिचं नाव आहे केट ब्लँचेट! केट ही हॉलीवूडमधील ऑस्ट्रेलियन अभिनेत्री आहे. या ऑस्कर विजेत्या अभिनेत्रीने कान्स फिल्म फेस्टीव्हर 2024 मधील संयुक्त राष्ट्राच्या पत्रकार परिषदेमध्ये हे विधान केलं आहे.

4/12

Cate Blanchett Rs 791 Crore Middle Class

संयुक्त राष्ट्राच्या दूत असलेल्या केट यांनी पत्रकारांशी बोलताना, "मी श्वेतवर्णीय आहे. मी प्रव्हिलेज कुटुंबातील मध्यमवर्गीय आहे. मला वाटतं तुम्हाला ठाऊक आहे की, एखाद्यावर श्वेतवर्णीयांचा तारणहार असल्याचा आरोप अशावेळी केला जाऊ शकतो," असं म्हटलं.

5/12

Cate Blanchett Rs 791 Crore Middle Class

तसेच पुढे बोलताना, "अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास शेतातील निर्वासितांबरोबर बोलल्यावर तसेच पुनर्स्थापित राहत असलेली परिस्थिती पाहिल्यावर जगाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला आहे," अशी प्रतिक्रिया केटने नोंदवली.

6/12

Cate Blanchett Rs 791 Crore Middle Class

केट या मागील बऱ्याच काळापासून मानवतावादी हेतूने निर्वासितांसाठी काम करणाऱ्या सेलिब्रिटी कार्यकर्त्यांपैकी एक आहेत.  

7/12

Cate Blanchett Rs 791 Crore Middle Class

केट यांनी कान्सच्या मंचावर उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण 'पूर्णपणे कृतज्ञ' आहोत असं सांगितलं. तसेच या माध्यमातून 'या लोकांशी (विस्थापितांशी) संवाद' साधण्यासाठी व्यासपीठ मिळाल्याने इतरांना प्रोत्साहित करता आल्याचं समाधान वाटत आहे, असंही केट म्हणाल्या.

8/12

Cate Blanchett Rs 791 Crore Middle Class

मात्र नेटकऱ्यांना केट यांनी 791 कोटींची संपत्ती असूनही स्वत:ला 'मध्यमवर्गीय' म्हणून घेणारं विधान फारसं पटलेलं दिसत नाही. अनेकांनी सोशल मीडियावर केट यांनी स्वत:ला मध्यमवर्गीय म्हटल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे.

9/12

Cate Blanchett Rs 791 Crore Middle Class

सोशल मीडियावर अनेकांनी केटला 'मी मध्यमवर्गीय आहे', या विधानावरुन ट्रोल केलं आहे, असं फिमेल फर्स्ट डॉट को डॉट युके या वेबसाईटने म्हटलं आहे.  

10/12

Cate Blanchett Rs 791 Crore Middle Class

अनेकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवताना कोणत्याही अवस्थेत 791 कोटींची संपत्ती असलेल्याला मध्यमवर्गीय म्हणता येणार नाही, असं म्हटलं आहे.  

11/12

Cate Blanchett Rs 791 Crore Middle Class

तर बऱ्याच जणांनी केट यांची स्वत:ची फ्रेंचायझी असल्याची आठवण त्यांना करुन दिली आहे.  

12/12

Cate Blanchett Rs 791 Crore Middle Class

एकाने तर केट यांच्याकडे एवढी संपत्ती आहे की जगातील पहिल्या 30 हजार श्रीमंतांमध्ये तिचा क्रमांक लागतो असं म्हटलं आहे.