भाईंदरच्या उत्तन समुद्रात बुडाली कार

कार पार्क करून पर्यटक गेले फिरायला 

| Mar 10, 2021, 09:39 AM IST

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : भाईंदरच्या उत्तन समुद्रकिनाऱ्यावर काल संध्याकाळी एक कार समुद्रात बुडाल्याची  घटना समोर आली आहे. तरुणांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

1/5

मंगळवारी संध्याकाळी हे तरुण स्कॉर्पिओ गाडीने उत्तन समुद्रकिनाऱ्यावर फिरायल आले होते. समुद्रकिनारी आल्यानंतर या तरुणांनी बिनाधास्त गाडी तेथेत पार्क करुन ते फिरायला निघून गेले. 

2/5

थोड्यावेळानंतर समुद्राला भरती आल्यामुळे गाडी समुद्राच्या पाण्यात बुडायला सुरुवात झाली. 

3/5

ही गोष्ट तेथील स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्शिशमन दलाला कळवले.

4/5

 त्यानंतर अग्शिशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत ही गाडी समुद्रातून खेचून बाहेर काढली.

5/5