Shashi Tharoor यांना म्हणायचंय काय? The Kerala Story वादावर सूचक ट्विट, म्हणतात...

The Kerala Story: काँग्रेस खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांच्या ट्विटमुळे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

| Apr 30, 2023, 21:18 PM IST

Shashi Tharoor On The Kerala Story: अनेकजण उत्सुकता असलेल्या असलेल्या 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाच्या ट्रेलरने इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट 5 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र, सिनेमा येण्याआधीच मोठा वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता काँग्रेस खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांच्या ट्विटमुळे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

1/5

रिलीजपूर्वीच विपुल शाहच्या प्रॉडक्शन हाऊसने बनवलेला 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट (The Kerala Story) वादात सापडला आहे. ट्रेलर समोर येताच नव्या वादाला तोंड फुटलंय.

2/5

केरळमधील 32,000 मुलींना इस्लाम धर्म स्वीकारून सीरियाला (ISISI) पाठवल्याचा दावा या सिनेमामध्ये करण्यात आला आहे. त्यावर आता विविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

3/5

काँग्रेस तसेच इतर डावे पक्ष 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. अशातच आता काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

4/5

द केरल स्टोरी वादावर, 'ही तुमच्या केरळची गोष्ट असू शकते. मात्र, ही आमच्या केरळची कथा असू शकत नाही', असं शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी ट्विट करत म्हटलं आहे. शशी थरूर (Shashi Tharoor Tweet) यांच्या ट्विटमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

5/5

दरम्यान, इंडियन युनियन मुस्लीम लीग, काँग्रेस, सीपीआय-एमने हा चित्रपट संघ परिवाराचा (RSS) अजेंडा पूर्ण करण्यासाठी बनवण्यात आल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता आगामी काळात हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.