भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानात विकसित करणारा 'द मिसाईल मॅन'...
आजच्या दिवशी 27 जुलै 2015 मध्ये कलामांनी या जगाचा निरोप घेतला. आज कलामांना जाऊन 9 वर्ष झाली.
'द मिसाईल मॅन' म्हणून अब्दुल कलाम यांना ओळखलं जातं. 'माणसाने कायमच विद्यार्थी राहून शिकत रहावं' असं ते फक्त फक्त म्हणायचेच नाही तर ते स्वत:सुद्धा तसे वागायचे.
1/9
2/9
3/9
4/9
5/9
रोहिणी उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर डॉ. कलाम यांनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठी SLV तंत्रज्ञानाचा वापर केला. यासाठी त्यांना डेव्हिल आणि प्रोजेक्ट व्हॅलिअंट या दोन प्रकल्प तयार करायचे होते. त्यासाठी त्यांना निधी देण्यास भारत सरकारने नकार दिला. मात्र पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विरोध पत्करुन कलामांनी एरोस्पेस प्रकल्पांसाठी गुप्त निधी मिळवला.
6/9
अब्दुल कलामांच्या कारकीर्दीत भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानात एक एक पाऊल प्रगतीच्या दिशेने पुढे टाकायला सुरुवात केली. कलामांच्या वीस वर्षाच्या अनुभवामुळे संरक्षण मंत्रालयाने अग्नी आणि पृथ्वी प्रकल्पांतर्गत अनेक क्षेपणास्त्रं विकसित केली. डॉ. कलाम 1992 ते 1999 दरम्यान भारताच्या संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार होते.
7/9
पोखरणची अणुचाचणी यशस्वी होण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पाकिस्तान आणि अमेरिकेला गाफिल ठेवत त्यांना ही चाचणी करणं वाटतं तेवढं सोपं नव्हतं. भारताने अणुचाचणी करण्याला जगाचा विरोध होता. त्यावेळी अमेरिका आणि इतर देशांनी भारतावर आर्थिक बंदी घातली होती. सॅटेलाईटच्या मदतीने अमेरिका भारताच्या हालचालींवर करडी नजर ठेवत होता.
8/9
9/9