महाराष्ट्रातील रहस्यमयी खंडोबा मंदिर! जेजुरी गडावर खरचं नऊ लाख पायऱ्या आहेत का?

जेजुरी गड हा समुद्रसपाटीपासून 2355 फूट उंचीवर आहे. जाणून घेवूया खंडोबा मंदिराची रहस्ये. 

| Apr 08, 2024, 20:34 PM IST

Pune Jejuri Temple : यळकोट यळकोट जय म्हालार... जेजुरीचा खंडोबा हे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. लाखो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरीत येत असतात.    मनी आणी मल्ल या दोन राक्षसांनी  भगवान ब्रहामाची तपस्या केली. ब्रम्हदेव प्रसन्न झाले. त्यांनी मनी- मल्लला वरदान दिले, त्यामुळे ते दोघे शक्तिशाली झाले. पृथ्वीवर लोकांना ते त्रास देऊ लागले. मनी आणि मल्लाचा नाश करण्यासाठी शंकर खंडेरायाच्या रुपात पृथ्वीवर अवतरेल अशी अख्यायिका आहे.  

1/7

जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचं आणि अठरापगड जातीजमातीचे कुलदैवत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यातील भाविक येथे खंडोबाच्या दर्शनासाठी येतात. 

2/7

जेजुरी गावात असलेल्या जेजुरी गडावर खंडोबाचे मंदिर आहे. गडावर चढण्यासाठी 385 पायऱ्या आहेत. या पायऱ्यांसाठी 9 लाख दगड वापरण्यात आले. यामुळे याचा उल्लेख 9 लाख पायरी म्हणून केला जातो.   

3/7

नवी जोडपी खंडेरायाच्या दर्शनाला गेल्यास पत्नीला उचून देवळात नेण्याची प्रथा आहे.  सोमवती अमावस्येला खंडोबाच्या मंदिरात विशेष गर्दी असते. भाविक भंडारा आणि खोबऱ्याची उधळ करतात. 

4/7

 मुख्य मंदिरात मंदिरात खंडोबा आणि त्यांची पत्नी म्हाळसा यांची मूर्ती आहे. खंडोबाचे हे मंदिर पेशव्यांच्याकाळात बांधले गेले.दगडी दीपमाळा आहेत. जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचे प्रतिक आहे. 

5/7

मंदिराच्या शिखरातील शिवलिंगाला स्वर्गलोक समजले जाते.  मुख्य मंदिरातील स्वयंभूलिंगाला भूलोक आणि गाभार्‍यातील भुगर्भात असलेल्या शिवलिंगाला पाताळलोक समजले जाते.

6/7

जेजुरीगडावर असलेल्या या खंडोबा मंदिरात गुप्त शिवलिंग आहेत.  वर्षातून फक्त एकदाच महाशिवरात्रीला ही गुप्त शिवलिंगे उघडली जातात. 

7/7

 पुण्यातील जेजुरीत असलेले खंडोबा मंदिर अत्यंत रहस्यमयी आहे. खंडोबा मंदिराबाबत अनेक अख्यायिका देखील सांगितल्या जातात.