मुंबई-रायगड अंतर अवघ्या 20 मिनिटात पार करता येणार

मुंबई-रायगड अंतर अवघ्या 20 मिनिटात पार करता येणार आहे.  ट्रान्सहार्बर सी-लिंकची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. नोव्हेंबरपर्यंत याचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 

May 24, 2023, 23:23 PM IST

Mumbai Trans Harbour Link: शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली.  नोव्हेंबर पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या ट्रान्स हार्बर सी लिंकमुळे मुंबई आणि नवी मुंबई हे अंतर फक्त २० मिनिटांत पार करता येणार आहे.

1/6

मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक देशातील सर्वात लांब समुद्री पूल मानला जात आहे. मुंबई आणि नवी मुंबई हे अंतर फक्त 20 मिनिटांत पार करता येणार आहे.  नोव्हेंबरमध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.   

2/6

 नवी मुंबई हा मार्ग मुंबई-पुणे हायवेला  जोडला जात आहे. यामुळे मुंबई-पुणे अंतरही कमी होणार आहे. पुढे हा मार्ग राज्य महामार्ग क्रमांक 54 लाही जोडला जाणार आहे.

3/6

ट्रान्स हार्बर सी लिंकच्या उजव्या बाजूवरील शिवडी ते चिर्लेपर्यंतच काम पूर्ण झालं आहे.

4/6

 हा ट्रान्स हार्बर सी लिंक 22 किलोमीटर इतका लांब आहे. 22 किमीच्या या शेवटच्या डेकला गोल्डन डेक असे म्हटले जाते.

5/6

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच ओपन डेक बसमधून, मुंबई ट्रान्सहार्बर लिंकवरुन प्रवास केला. पाहणी करताना फडणवीसांच्या हाती स्टिअरिंग होतं आणि शिंदे फडणवीसांच्या बाजूला बसले होते. 

6/6

शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. नोव्हेंबर पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.