'अम्फान' चक्रीवादळाने धडकताच दाखवले रौद्ररुप

अम्फान वादळात जवळपास १० ते १२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

May 21, 2020, 15:34 PM IST

सुपर सायक्लोन अम्फान (Amphan Cyclone) दक्षिण पश्चिमेकडील दीघा किनारपट्टीला धडकले आहे.  बुधवारी दुपारी आलेल्या या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा किनारपट्टीलगतच्या परिसराचे मोठे नुकसान झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये पाच लाख आणि ऑडिशात १ लाख ५८ हजार ६४० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. 

1/9

अम्फान वादळात जवळपास १० ते १२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.  

2/9

कोलकातामध्ये वादळाचा तडाखा बसला. या वादळातून सावरण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्राकडे मदतीची मागणी केली आहे.  

3/9

कोलकाताला चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर ओडिशा, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडूमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

4/9

एनडीआरएफच्या टीमसोबत देशातील तिन्ही सैन्य दलाचे अधिकारी सतर्क झाले असून ते अॅक्टीव मोडमध्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.  

5/9

चक्रीवादळामूळे अनेक घरांचे देखील नुकसान झाले आहे.  

6/9

ताशी १६० ते १८० किमीच्या वादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मोठी नासधूस झाली आहे.   

7/9

६ तासांच्या अम्फान या वादळ वाऱ्यामुळे कोलकाता विमानतळाचे मोठे नुकसान झाले आहे.   

8/9

रनवे आणि हॅंगर्स पाण्यात बुडाले आहेत. कोलकाता विमानतळाचा एक भाग पाण्याखाली आहे. 

9/9