जगातील सर्वात लहान देश, लोकसंख्या फक्त 27 लोकं

क्षेत्रफळाच्या आधारावर भारत जगातील 7 व्या क्रमांकाचा देश आहे. येथे देशातील एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी अनेक दिवस लागतात. पण तुम्हाला माहित आहे का की जगात असा एक देश आहे, ज्याचे क्षेत्रफळ बास्केटबॉलच्या मैदानाइतके आहे. एवढ्या छोट्या जागेत देश कसा असू शकतो हे जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटते. आज आम्ही तुम्हाला या देशाशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.

Dec 04, 2021, 17:04 PM IST

1/5

सीलँडला अद्याप आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली नाही. या कारणास्तव, जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी आहे, ज्याचे क्षेत्रफळ 0.44 चौरस किलोमीटर आहे. येथील लोकसंख्या 800 आहे.

2/5

सीलँडचे भूपृष्ठ 6000 चौरस फुटांवर पसरलेले आहे. हा देश एवढा छोटा आहे की तुम्हाला तो गुगल मॅपवरही सापडत नाही. असे मानले जाते की हे ठिकाण ब्रिटनने दुसर्‍या महायुद्धात विमानविरोधी संरक्षणात्मक तोफा म्हणून बांधले होते. 2011 च्या आकडेवारीनुसार, सीलँडची लोकसंख्या केवळ 27 लोक आहे.

3/5

या छोट्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे डोनेशनवर अवलंबून आहे. मात्र, आता लोकांना या देशाची माहिती मिळत असल्याने लोक पर्यटनासाठीही येथे पोहोचू लागले आहेत. सीलँडचे क्षेत्रफळ खूपच कमी आहे, त्यामुळे जेव्हा लोकांना पहिल्यांदा इंटरनेटच्या माध्यमातून याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी भरपूर देणग्या दिल्या. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना आर्थिक मदत मिळाली.

4/5

माइक्रो नेशन म्हटल्य़ा जाणारा हा भाग अनेकांनी काबिज केला. 9 ऑक्टोबर 2012 ला रॉय बेट्स नावाच्या व्यक्तीने स्वत:ला सीलँड प्रिंस घोषित केले. रॉय बेट्सच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा येथे शासन करु लागला. रॉय बेट्सने सीलँडसाठी पोस्ट तिकीट, पासपोर्ट आणि चलन देखील सुरु केलं होतं. ज्यावर रॉय बेट्सची पत्नी जॉन बेट्सचे फोटो आहेत. या देशाचा स्वत:चा एक झेंडा देखील आहे. ज्यामध्ये लाल, पांढरा आणि काळा रंग आहे.

5/5

या देशाचं नाव सीलँड आहे. याला मायक्रो नेशन देखील म्हटलं जातं. हा देश इंग्लंड जवळ आहे. इंग्लंडच्या सफोल्क समुद्र किनाऱ्यापासून 10 किलोमीटर अंतरावर हा देश आहे. सीलँड हा समुद्रात आहे. जो दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटेनने बनवला होता. नंतर तो खाली करण्यात आला.