थायरॉईडची 'ही' आहेत 5 लक्षणे, लगेच ओळखा आणि उपचार घ्या

भारतातील 50 टक्के महिला या थायरॉईडच्या समस्यमुळे त्रस्त आहेत. ही एक अतिशय सामान्य समस्या बनली आहे. थायरॉईडमुळे शरीराच्या कोणत्या भागात वेदना होतात? जाणून घ्या सविस्तर

| Aug 08, 2024, 17:36 PM IST
1/6

थायरॉईडच्या वेदना कुठे होतात?

थायरॉईडची समस्या अनेक लोकांना आहे. केवळ महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही ही समस्या दिसून येत आहे. यामध्ये सूज आणि वेदना अशा अनेक समस्या उद्भवतात. 

2/6

मानेच्या मध्यभागी वेदना

थायरॉईडने त्रस्त असलेल्या रुग्णांना मानेभोवती तीव्र वेदना होतात. हे थायरॉईडचे सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. ज्यामध्ये रुग्णांना मानेवर तीव्र सूज येऊ लागते. 

3/6

स्नायूमध्ये वेदना

थायरॉईडचे प्रमाण वाढल्याने रुग्णांना स्नायूमध्ये वेदना होऊ शकतात. त्यामुळे अशा वेळी जास्त काळ दुर्लक्ष करू नका. हे खूप गंभीर असू शकते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

4/6

पायांमध्ये वेदना

थायरॉईडमध्ये रुग्णांना पायांमध्ये देखील तीव्र वेदना होऊ शकतात. पायांमधील वेदना या दीर्घकाळ असू शकतात. अशा परिस्थितीत रुग्णांना उभे राहण्यास देखील त्रास होते. 

5/6

तीव्र संयुक्त वेदना

थायरॉईड असणाऱ्या रुग्णांना सांध्यामध्ये वेदना होतात. यामध्ये रुग्णांच्या सांध्यावर याचा परिणाम दिसून येतो. अशा वेळी रुग्णांच्या गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना होतात. रुग्णांना उठताना आणि बसतानाही याचा त्रास होतो. 

6/6

कान दुखणे

थायरॉईडच्या रुग्णांना कानामध्ये तीव्र वेदना होऊ शकतात. काही वेळा या वेदना जबड्यापर्यंत होतात. तर अशा वेळी तुम्ही थेट डॉक्टरांचा सल्ला घ्या.