'या' 5 प्रकारच्या पानांमुळे Bad Cholesterol चा होईल नायनाट, हार्ट अटॅकचा धोका टळण्याचा तज्ज्ञांचा दावा

हल्ली लोकांमध्ये हाय कोलेस्ट्रॉलची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जर तुम्हालाही याचा त्रास होत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही पानांबद्दल सांगणार आहोत जे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर ठरणार आहे. 

नेहा चौधरी | Jul 13, 2024, 13:55 PM IST
1/7

आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) आणि वाईट कोलेस्ट्रॉल (LDL). कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असून तो रक्तात आढळतो. हा पदार्थ शरीरासाठी अनेक महत्त्वाच्या कार्यांमध्ये मदत करतो. हार्मोन्स आणि जीवनसत्त्वे तयार करण्यास याचा फायदा होतो. मात्र शरीरात खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि हृदयाशी संबंधित अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो.

2/7

त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक असतं. अशा परिस्थितीत आयुर्वेदाच्या मदतीने तुम्ही शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित मिळवू शकता. आयुर्वेदात अशा अनेक औषधी वनस्पती आणि पानांचा उल्लेख आहे ज्यांनी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी फायदा होतो.   

3/7

कडुलिंबाची पाने

कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट, दाहक-विरोधी आणि लिपिड कमी करणारे गुणधर्म असतात. हे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवण्यास फायदेशीर ठरते. 

4/7

तुळशीची पाने

तुळशीची पाने आरोग्यासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाहीत. त्यांच्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. तुम्ही तुळशीची 3-4 पाने कच्ची चघळून रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास किंवा त्याचा अर्क बनवून पिल्यास फायदा होतो. 

5/7

कढीपत्ता

कढीपत्ता अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असून हे खराब कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवण्यास फायदेशीर ठरतं. 

6/7

मेथीची पाने

मेथीची पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. ही फायबर, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असून जे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करते. 

7/7

जामुनची पाने

जामुनची पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँथोसायनिन्ससारखे गुणधर्म आहेत. जे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करतं. तुम्ही जामुनची पाने पावडर, चहा किंवा डेकोक्शनच्या स्वरूपात घेऊ शकता. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)    

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x