6 वर्षे बॉक्स ऑफिसवर सुनील शेट्टीचा होता ताबा, चित्रपटांच्या कमाईने निर्माते झाले श्रीमंत, 'हे' आहेत हिट चित्रपट

अभिनेता सुनील शेट्टी 90 च्या दशकात बॉक्स ऑफिसवर खूप हिट झाला होता. आज तो 63 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुनील शेट्टीच्या बॉक्स ऑफिस रेकॉर्डबद्दल जाणून घ्या सविस्तर

| Aug 11, 2024, 16:03 PM IST
1/6

सुनील शेट्टी वाढदिवस

अभिनेता सुनील शेट्टी आज 63 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त आम्ही तुमच्यासाठी अभिनेत्याचे 90 च्या दशकातील लोकप्रिय चित्रपटांची यादी घेऊन आलो आहोत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 

2/6

बलवान

अभिनेत्री सुनील शेट्टीचा 'बलवान' हा चित्रपट 1992 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता. या चित्रपटाने त्यावेळी 3.50 कोटी रुपयांची कमाई केली होती. 

3/6

दिलवाले

दिग्दर्शक हॅरी बावेजा आणि करण राजदान यांच्या 'दिलवाले' चित्रपटाने सुनील शेट्टीच्या अभिनय कारकिर्दीला मोठे वळण मिळाले. त्यावेळी दिलवाले सुपरहिट ठरला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 6.33 कोटी रुपये कमाई केली. 

4/6

मोहरा

सुनील शेट्टीने 'मोहरा' या चित्रपटात विशाल अग्निहोत्रीच्या भूमिकेत प्रेक्षकांची मने जिंकली. राजीव राय यांच्या या चित्रपटामुळे सुनील शेट्टी टॉप कलाकारांपैकी एक ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 12.01 कोटींची कमाई केली. 

5/6

गोपी-किशन

1994 मध्ये 'गोपी किशन' हा सुनील शेट्टीचा चौथा चित्रपट प्रदर्शित झाला. हा कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. करिश्मा कपूर आणि सुरेश ओबेरॉय सारखे कलाकारही या चित्रपटात होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 4.81 कोटींची कमाई केली होती.

6/6

बॉर्डर

सुनील शेट्टीचा 'बॉर्डर' चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील आयकॉनिक चित्रपट मानला जातो. या चित्रपटात सुनील शेट्टीने भारतीय लष्करातील अधिकारी भैरो सिंगची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 39.46 कोटींची कमाई केली होती.