किंमत 5.44 लाख आणि मायलेज 26KM, या आहेत स्वस्त ऑटोमेटिक कार

सर्वात स्वस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या या आहेत ऑटोमेटिक कार. जाणून घ्या सविस्तर

| Aug 14, 2024, 18:07 PM IST
1/6

ऑटोमेटिक कार

गेल्या काही वर्षात लोक ऑटोमेटिक कार घेत आहेत. ऑटोमेटिक कारचे बरेच फायदे देखील आहेत. या गाड्यांमध्ये तुम्हाला गिअर्स बदलण्याची चिंता करण्याची गरज नाही. 

2/6

मारुती Wagon R

मारुती Wagon R दोन भिन्न पेट्रोल इंजिन पर्यायांसह येते. परंतु 1.2 लीटर पेट्रोल इंजिन ऑटोमेटिक प्रकारात वापरले गेले आहे. या कारची 6.45 लाख रुपये आहे. 

3/6

मारुती सेलेरियो

मारुती सेलेरियोच्या ऑटोमेटिक व्हेरियंटमध्ये 1 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन आहे. त्याचे ऑटोमेटिक प्रकार देखील VXI आणि ZXI मॉडेल्सवर आधारित आहे. या कारची किंमत 6.29 लाख रुपये आहे. 

4/6

मारुती Maruti S-Presso

मारुती एस-प्रेसोचे ऑटोमेटिक व्हेरियंट VXI मॉडेलवर आधारित आहे. यात 1 लीटर पेट्रोल इंजिन आहे जे 68PS पॉवर आणि 90Nm टॉर्क जनरेट करते. या कारची किंमत 5.67 लाख रुपये आहे. 

5/6

मारुती ऑल्टो k10

मारुती ऑल्टो k10 चे ऑटोमेटिक व्हेरियंट VXI मॉडेलवर आधारित आहे. यात 1 लीटर पेट्रोल इंजिन आहे. या कारची किंमत 5.51 लाख रुपये आहे. 

6/6

रेनॉल्ट क्विड

रेनॉल्ट क्विड चार ऑटोमेटिक ट्रिममध्ये उपलब्ध आहे. यामध्ये कंपनीने 1 लीटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन वापरले आहे. या कारची किंमत 5.44 लाख रुपये आहे.