PHOTO: पावसाळ्यात 'घरचा वैद्य' म्हणून काम करतात स्वयंपाकघरातील 'हे' मसाले

Monsoon Health Tips: बदलत्या वातवरणामुळे सर्दी खोकला आणि ताप यांच्यासारखे आजार बळावतात. अशावेळी स्वंयपाकघरातील मसाले 'घरचा वैद्य' म्हणून उपचार करतात. मसाल्यांच्या व्यापारांमध्ये भारत अग्रेसर आहे. हे फक्त चवीलाच नाही तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास ही तितकंच मोलाचं कार्य करतात.   

Jul 03, 2024, 18:34 PM IST
1/7

जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी मदत करणाऱ्या या मसाल्यांना आयुर्वेदातही तितकच महत्त्व दिलं आहे.   

2/7

सध्या पावसाळ्यामुळे रोगराईचं प्रमाण वाढत जात आहे.त्यामुळे साथीच्या आजारांनी डोकं वर काढलेलं आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील मसल्यांचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं.    

3/7

हळद

'हळद' ही जंतूनाशक समजली जाते. जखम झाल्यावर हळद लावल्याने कोणत्याही प्रकारचं पॉइजन होत नाही. ही हळद पावसाळ्यातील आजारांना लांब ठेवण्यासाठी मदत करते. रोज रात्री झोपण्यापुर्वी 'हळदीचं दूध' प्यायल्याने खोकला दूर होण्यास मदत होते. 

4/7

लवंग

लवंगला अँटीव्हायरल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आढळतात. पावसाळ्यात तापाची साथ मोठ्या पसरते. थंडी ताप येत असल्यास 'लवंगीचा काढा' करुन प्यायल्याने ताप लवकरच उतरण्यास मदत होते. 

5/7

जिरे

फोडणीसाठीचा महत्त्वाचा घटक म्हणजे 'जीरं'. जीऱ्याची फोडणी दिल्यावर आमटी,डाळ किंवा भाज्यांची चव आणखीनच वाढते. जीऱ्यामुळे पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते. सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी 'जीऱ्याचं पाणी' प्यायल्याने पचनसंस्था सुधारते. 

6/7

काळी मिरी

'काळी मिरी' ही उष्ण असून शरीरासाठी आरोग्यवर्धक मानली जाते. काळ्या मिरीचा समावेश आहारात केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पावसाळ्यात आल्याचा चहा सगळ्यांना आवडतो. 

7/7

आल्याप्रमाणे चहामध्ये 'गवतीचहा' आणि 'काळ्या मिरी'चा समावेश केल्यास आरोग्यदायी मानलं जातं.