ईशा देओलपासून मलायका, डिम्पल कपाडियापर्यंत; अफेअरमुळे मोडला 'या' जोडप्यांचा संसार

नुकताच ईशा देओल आणि भरत तख्तानीच्या विभक्त होण्याच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का दिला. गेल्या अनेक दिवसांपासून या जोडीच्या घटस्फोटाच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या. भरत तख्तानी या घटस्फोटामागचं कारण असल्याचं म्हटलं जातंय. आज आम्ही तुम्हाला या रिपोर्टमध्ये सांगणार आहोत की, ज्यांचं लग्न तिसऱ्याच्या एन्ट्रीमुळे तुटलं आहे. या लिस्टमध्ये अरबाज खान ते सैफ अली खानच्या नावाचा सामावेश आहे. नजर टाकूया या लिस्टवर

Feb 07, 2024, 18:55 PM IST

नुकताच ईशा देओल आणि भरत तख्तानीच्या विभक्त होण्याच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का दिला. गेल्या अनेक दिवसांपासून या जोडीच्या घटस्फोटाच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या. भरत तख्तानी या घटस्फोटामागचं कारण असल्याचं म्हटलं जातंय. आज आम्ही तुम्हाला या रिपोर्टमध्ये सांगणार आहोत की, ज्यांचं लग्न तिसऱ्याच्या एन्ट्रीमुळे तुटलं आहे. या लिस्टमध्ये अरबाज खान ते सैफ अली खानच्या नावाचा सामावेश आहे. नजर टाकूया या लिस्टवर

 

1/8

सामंथा प्रभू-नागा चैतन्य

सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी काही वर्षांपुर्वी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. नागा चैतन्य आणि सामंथाच्या घटस्फोटाच्या बातमीने सगळ्यांनाच हैराण केलं होतं. रिपोर्टनुसार या दोघांच्या घटस्फोटामागचं कारण नागा चैतन्यचं एक्स्ट्रा मैरिटल अफेअर होतं यामुळे या जोडीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

2/8

अमृता सिंह-सैफ अली खान

अमृता सिंह आणि सैफ अली खानचं लग्न खूप चर्चेत होतं मात्र नंतर हे दोघंही वेगळे झाले. समोर आलेल्या बातम्यांनुसार सैफ अली खान विवाहीत असूनही लग्नानंतर तो प्रेमात पडला होता यामुळेच या दोघांचा घटस्फोट झाला 

3/8

मलायका अरोरा-अरबाज खान

समोर आलेल्या माहितीनुसार मलायका अरोराचं अर्जून कपूरसोबत अफेअर आहे ज्यामुळे मलायका आणि अरबाज खान दोघंही वेगळे झाले. यानंतर मलायकाने सगळ्यांसमोर अर्जून कपूरवरील प्रेमाची कबुली सर्वांसमोर दिली. काही दिवसांपुर्वीच अरबाज खान दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे.   

4/8

सारिका-कमल हासन

साऊथ अभिनेता कमल हसनचं नावदेखील या यादीत सामाविष्ट आहे. कमल हासन आणि सारिकाचं लग्न तुटण्यामागचं कारण गौतमी असल्याचं बोललं जातं.

5/8

सुझैन खान-ऋतिक रोशन

ऋतिक रोशन आणि सुझैन  खान  ही जोडी कायम चर्चेत असायची. वृत्तानुसार कंगना रानौतच्या एन्ट्रीनंतर ऋतिक रोशन आणि सुझैन खानचं नातं खराब होवू लागलं. काही वर्षांनंतर या कपलने घटस्फोट घेतला.   

6/8

डिंपल कपाडिया-राजेश खन्ना

डिंपल कपाडिया यांनी खूप कमी वयातच राजेश खन्नायांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर या दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. असं म्हटलं जातं की, राजेश खन्ना यामगचं कारण होते त्यांचं एका अभिनेत्रीसोबत अफेअर होतं.

7/8

रामलता-प्रभुदेवा

रामलतासोबत लग्नानंतर प्रभूदेवा यांचं अफेअर साऊथ अभिनेत्री नयनतारासोबत होतं. प्रभूदेवा आणि नयनताराचं अफेअर सुरु असताना रामलताला प्रभूदेवासोबत घटस्फोट घ्यावा लागला.  

8/8

ईशा देओल-भरत तख्तानी

आता या यादीत ईशा देओल आणि भरत तख्तानीचं नाव सामाविष्ट झालं आहे. भरत तख्तानी आणि ईशा देओलने वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार भरत तख्तानीचं अफेअर सुरु असताना हे कपल या मोडवर पोहचले आहेत.