ब्रेडच्या पाकिटावर 'या' 6 गोष्टींचा उल्लेख दिसला तर, तो चुकूनही खरेदी करु नका

ब्रेडमध्ये असणारे काही घटक आरोग्यासाठी घातक.... अज्ञानात राहण्यापेक्षा माहिती वाचा, लक्षात ठेवा आणि संकटांपासून दूर राहा. 

Jul 17, 2024, 14:27 PM IST

ब्रेड... अनेकांच्याच दैनंदिन जीवनातील आणि दैनंदिन जेवणातील एक घटक. तुम्हीही दर दिवशी ब्रेड खाताय का? मग तो खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्या... 

 

1/7

ब्रेड

things you should know before buying a bread packet

अनेक घरांमध्ये कधी नाश्त्याला तर कधी जेवणात, कधी हलकंफुलकं काही खायचं झाल्यास, तर कधी काहीतरी छानसं बनवायचं झाल्यास ब्रेडचा सर्रास वापर केला जातो. पण, ब्रेड खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आणि त्याबाबत काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं. 

2/7

साखर

things you should know before buying a bread packet

ब्रेड बनवण्यासाठीच्या प्रक्रियेमध्ये यिस्ट अॅक्टिव्ह करण्यासाठी साखरेची आवश्यकता असते. त्यामुळं ब्रेड जेव्हा केव्हा खरेदी कराल तेव्हा पाकिटावर साखरेचं प्रमाण तपासून पाहा. Added Sugar असं लिहिलेलं दिसल्यास ब्रेड खरेदी करणं टाळा.   

3/7

मीठ

things you should know before buying a bread packet

साखरेप्रमाणं ब्रेडमध्ये जर पाकिटावर Added Salt अस लिहिलेलं आढळल्यास तो खरेदी करू नका. मिशिगन स्टेट युनिवर्सिटीच्या माहितीनुसार एका ब्रेड स्लाईसमध्ये 100 ते 200 मिलीग्रॅमहून अधिक सोडियम नसावं.   

4/7

ब्रेडसाठीचं साहित्य

things you should know before buying a bread packet

ब्राऊन ब्रेड, मल्टीग्रेन ब्रेड आणि अशा विविध ब्रेडचे प्रकार कितीही आरोग्यदायी वाटत असले तरीही या प्रक्रियेमध्ये गव्हासमवेत इतरही प्रकारचं पीठ मिसळलं जातं. त्यामुळं साहित्याची यादी अवश्य तपासा   

5/7

तारीख

things you should know before buying a bread packet

ब्रेड खरेदी करताना तो पॅक केल्याची तारीख आणि त्याच्या वापराची तारीखही पाहून घ्या. बेस्ट बिफोर असं नमूद करून ही तारीख पाकिटावर छापलेली असते.   

6/7

प्रिझर्व्हेटीव्ज

things you should know before buying a bread packet

ब्रेड जाता असतो तेव्हा तो अधिक चवीष्ट लागतो. पण, अनेक ब्रँड ब्रेडची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये रंग, एडिटिव्ज आणि प्रिझर्व्हेटीव्जचा वापर करतात.   

7/7

फायबरचं प्रमाण

things you should know before buying a bread packet

ब्रेडमधील सर्वात लोकप्रिय घटक म्हणजे फायबर. प्रोसेसिंगच्या वेळी ब्रेडमधील फायबरचं प्रमाण अतिशय कमी होतं आणि ही बाब आरोग्यासाठी घातक आहे.