शाळेचा उंबराही न ओलांडलेली ही अभिनेत्री आज 224 कोटींची मालकीण; नवऱ्यापेक्षा 5 पट श्रीमंत, तुम्ही ओळखलंत का?

बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे जी कधीच शाळेत गेली नाही. तरीही तिची टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते गणना. आज ती अभिनेत्री आहे 224 कोटींची मालक. काण आहे ही सुंदरी? जाणून घ्या सविस्तर

| Sep 01, 2024, 12:19 PM IST
1/7

प्रसिद्ध अभिनेत्री

बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा जन्म हा हाँगकाँगमध्ये 16 जुलै 1983 मध्ये झाला आहे. अभिनेत्रीचे वडील हे मुस्लिम असून तिची आई ही ख्रिश्चन आहे. 

2/7

कतरिना कैफ

बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ.  सुरुवातीच्या काळात अभिनेत्रीने लंडनमध्ये मॉडलिंग क्षेत्रात काम केलं आहे.

3/7

कधीच शाळेत प्रवेश

कतरिना कैफचे वडील हे एक बिझनेसमन होते. अभिनेत्रीने तिचे बालपण हे सुमारे 18 देशांमध्ये घालवले आहे. त्यामुळे तिला कधीच शाळेत प्रवेश घेता आला नाही. 

4/7

'बूम' चित्रपट

परदेशात जन्म घेतलेली कतरिना ही तरुण वयात भारतात आली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये काम शोधले. 2003 मध्ये 'बूम' चित्रपटातून तिने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 

5/7

टॉप अभिनेत्रींपैकी एक

मात्र, कतरिनाचे पदार्पण प्लॉप ठरले. त्यानंतर तिने काही वर्षांमध्येच बॉलिवूडमध्ये नाव मोठे केले. आता ती बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. 

6/7

224 कोटी संपत्ती

कतरिना कैफची गणना आता बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते. तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये देखील तिची गणना केली जाते. तिची संपत्ती 224 कोटी रुपये आहे. 

7/7

पतीपेक्षा पाचपट श्रीमंत

कतरिना कैफ ही तिच्या पती विक्की कौशलपेक्षा खूप पुढे आहे. विक्कीची संपत्ती 41 कोटी आहे. कतरिना तिच्या पतीपेक्षा पाचपट श्रीमंत आहे.