घरी तयार केलेली 'ही' पेस्ट मोत्यासारखे चमकवेल तुमचे दात!

चेहऱ्यावर सुंदर हसू येण्यासाठी पांढरेशुभ्र दात प्रत्येकाला हवे असतात. मात्र अनेकांचे पिवळे दात असतात आणि याचे कारण म्हणजे दात व्यवस्थित न साफ ​ठेवणं. आज आम्‍ही तुम्‍हाला दात मोत्‍यांसारखे चमकण्‍याच्‍या काही टिप्स सांगणार आहोत. 

Jul 13, 2023, 23:03 PM IST
1/5

एकदा दातांमध्ये घाण साचली की, ती काढणं फार कठीण होतं. अनेकदा यामुळे दात किडू लागतात.

2/5

दात चमकवण्यासाठी एक चमचा मीठ घ्या आणि त्यात थोडा लिंबाचा रस आणि मोहरीचे तेल घाला. या तिन्ही गोष्टी एकत्र करून पेस्ट बनवा.

3/5

ही पेस्ट दिवसातून तीनदा ब्रशच्या मदतीने दातांवर लावा. यामुळे दात स्वच्छ आणि चमकदार होतील. 

4/5

या पेस्टमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. या पेस्टमुळे दात स्वच्छ होतात.  

5/5

दुसरा उपाय म्हणून संत्र्याची साल रोज दातांवर चोळावी. यामुळे दात साफही होतील आणि तोंडाला वासही येणार नाही. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)