जगातील सर्वात मोठं पान पाहिलं? आकार 2 King Size Beds पेक्षा मोठा; हे Photos पाहून व्हाल थक्क

World's Largest Leaf: जगातील हे सर्वात मोठं पान असून हे पान उचलण्यासाठी एकावेळेस तब्बल सात माणसं लागतात. या पानाची दखल जागतिक विक्रमांची नोंद ठेवणाऱ्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली आहे. या पानाबद्दल, हे पान नेमक्या कोणत्या वनस्पतीचं आहे, ही वनस्पती कुठे आढळून येते जाणून घेऊयात...

Feb 09, 2023, 20:29 PM IST
1/5

Worlds Largest Leaf

Worlds Largest Leaf: जगभरामध्ये सर्वात मोठ्या किंवा छोट्या गोष्टींचं नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं जातं. आतापर्यंत अनेक वेगवगेळ्या गोष्टींचे विक्रम लोकांनी आपल्या नावे केले आहेत. मात्र ज्या गोष्टींच्या नावावर विक्रम नोंदवण्यात आला आहे त्यामध्ये एका झाडाच्या पानाचाही समावेश आहे. हे पान फारच मोठं आणि खास असल्याने त्याचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. सामान्यपणे प्रत्येक झाडाचं पान हे खास असतं. कधी आकारामुळे तर कधी त्याच्या वैशिष्ट्यांमुळे आपल्याला रोज दिसणारी पानंही खासच असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे एका भल्या मोठ्या पानाची. या पानाला जगातील सर्वात मोठं पान असल्याचा सन्मान मिळाला आहे. (सर्व फोटो : गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

2/5

Worlds Largest Leaf

हे पान विक्टोरिया बोलिवियाना वॉटरलिली नावाच्या वनस्पतीचं आहे. सध्या हे पान त्याच्या आकारामुळे चर्चेत आहे. खरं तर या पानाचे फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

3/5

Worlds Largest Leaf

या फोटोमध्ये जवळजवळ सात जण हे एक पान उचलून घेऊन जाताना दिसत आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोंना 90 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

4/5

Worlds Largest Leaf

फोटोला देण्यात आलेल्या कॅफ्शनमधील माहितीनुसार हे पान विक्टोरिया बोलिवियाना वॉटरलिली प्रजातीच्या वनस्पतीचं असून नैसर्गिकरित्या या पानांचा आकार फार मोठा असतो. सामान्यपणे पानांचा व्यास 2.8 मीटर म्हणजेच 9 फूट 2 इंचांहून अधिक असतो.

5/5

Worlds Largest Leaf

फोटो दिसणाऱ्या पानाचा व्यास हा 3.2 मीटर म्हणजेच 10 फूट 6 इंच इतका होता. जो वाढून तब्बल 3.37 मीटर म्हणजेच 11 फूट झाला. या पानाचं क्षेत्रफळ 7.55 स्वेअर मीटर म्हणजेच 81.3 वर्ग फूट इतकं आहे. म्हणजेच या पानाचा आकार दोन किंग साईज बेड इतका आहे. भल्या मोठ्या पानांची ही वनस्पती ईशान्य बोलेवियामधील एल बेनीमधील लल्नोस डी मोक्सोसमध्ये आढळून येतं.