जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; कमाईच्या बाबतीत सचिन, धोनी, कोहलीलाही टाकतो मागे, 22 व्या वर्षी झाला निवृत्त

World's Richest Cricketer : विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि एम एस धोनी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही गाजलेली नावं आहेत. हे खेळाडू फक्त मैदानावरील कामगिरीमुळेच नाही तर कमाईच्या बाबतीतही श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत अव्वल स्थानी असतात. मात्र भारतातील असा एक खेळाडू आहे ज्याचं क्रिकेट करिअर हे फार छोटं होतं मात्र कमाईच्या आणि श्रीमंतीच्या बाबतीत तो सचिन, धोनी, कोहलीलाही मागे टाकतो. भारतातील दिग्गज क्रिकेटर्सची संपत्ती ही त्याच्या समोर काहीच नाही. 

| Dec 03, 2024, 14:01 PM IST
1/8

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर म्हणून भारतातील उद्योगपती कुमार मंगलम बिरला याचा मुलगा आर्यमन बिरलाचं नाव समोर येत आहे.  लहानपणापासूनच आर्यमनला क्रिकेटची खूप आवड होती. परंतु आज तो क्रिकेटर सोबतच एक यशस्वी व्यावसायिक देखील आहे. त्याची एकूण संपत्ती ही भारतातील स्टार क्रिकेटर्सपेक्षा दुप्पट आहे. 

2/8

आर्यमन बिरला एका व्यावसायिक कुटुंबातील असूनही त्याने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे ठरवले होते. आर्यमनने 2017-18 दरम्यान मध्यप्रदेशच्या रणजी ट्रॉफी सामन्यात डेब्यू केले. वर्ष 2018 मध्ये त्याला राजस्थान रॉयल्सने आयपीएल ऑक्शनमध्ये विकत घेतले.   

3/8

2019 मध्ये आर्यमनने मानसिक स्वास्थावर लक्ष केंद्रित करण्यासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला. त्याने अवघ्या 22 व्या वर्षी क्रिकेटमधील त्याच्या करिअरला पूर्णविराम दिला. मात्र क्रिकेटनंतर त्याने व्यवसायामध्ये लक्ष घातले आणि आपली एक वेगळी ओळख बनवली. 

4/8

आर्यमन ग्रासिम इंडस्ट्रीज आणि आदित्य बिरला फॅशन अँड रिटेल बोर्डाचा सदस्य आहे.  आयर्मन हा प्राणी प्रेमी असून तो प्राण्यांसाठी अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवत असतो. त्याने 'द पॉवस्टार कंपनी' ची सुरुवात केली असून हे प्राण्यांकरता एक खास स्टोअर आहे.   

5/8

आर्यमन आता आपल्या कुटुंबाचा व्यवसाय पुढे नेत असून त्यात महत्वाचं योगदान देखील देत आहे. बिरला समूह हा भारतातील सर्वात श्रीमंत आणि जुन्या व्यावसायिक कुटुंबापैकी एक आहे. त्यांचं क्षेत्र हे जवळपास 8.5 लाख कोटींमध्ये व्यापलं आहे. 

6/8

आर्यमन बिरला यांची एकूण संपत्ती ही 70 हजार कोटींच्या जवळपास आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर, एम एस धोनी आणि विराट कोहली हे श्रीमंतीच्या बाबतीत आर्यमनच्या आसपास देखील नाहीत.   

7/8

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्डस् आपल्या नावे केले. दोन दशकांपेक्षा जास्त क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या सचिने 100 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. रिपोर्टनुसार सचिन तेंडुलकर याची एकूण संपत्ती 170 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1500 कोटी इतकी आहे.

8/8

भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीची संपत्ती ही जवळपास 111 दशलक्ष डॉलर म्हणजेच 1000 कोटी इतकी आहे. तर विराट कोहलीची एकूण संपत्ती ही 93 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 800 कोटींच्या जवळपास आहे.