'चला शिकूया प्रगती करुया' आदिवासी पाड्यावर 'हेल्पिंग हँड'

Helping Hand : इच्छा असेल तर मार्गही निघतो, हे खरं करुन दाखवलंय मुंबईतल्या तीन मित्रांनी. गरजवंतांना मदत करण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या या तीन मित्रांनी एकत्र येत मदतकार्य सुरु केलं. सुरुवातीला छोटसं रोपटं असलेल्या या कार्याचा आता वटवृक्ष बनला आहे. 

Jun 18, 2024, 22:48 PM IST
1/6

इच्छा असेल तर मार्गही निघतो, हे खरं करुन दाखवलंय मुंबईतल्या तीन मित्रांनी. गरजवंतांना मदत करण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या या तीन मित्रांनी एकत्र येत मदतकार्य सुरु केलं. संतोष ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सारंग आणि संदीप लाखान असं या तिघांची नावं आहेत.. सुरुवातीला छोटसं रोपटं असलेल्या या कार्याचा आता वटवृक्ष बनला आहे. 

2/6

तीन मित्रांनी एकत्र येऊन हेल्पिंग हँड हा ग्रुप बनवला. गरजवंतांना मदत करणं हे या ग्रुपचं उद्दीष्ट्य होतं. सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात सुरुवात झालेल्या या कार्याने आता व्यापक स्वरुप घेतलं आहे. हेल्पिंग हँड ग्रुपमध्ये आता अंदाजे 250 ते 300 सभासद आहेत.

3/6

विशेष म्हणजे अनेक सभासद एकमेकांना ओळखतही नाहीत. पण मदतीसाठी या ग्रुपचे सभासद धडाडीने पुढाकार घेतात. वर्षातून तीन ते चार मदतीचे कार्यक्रम पार पाडले जातात. आणि यासाठी ग्रुपमधील सभासद प्रत्येकाला जमेल तशी मदत करतात.

4/6

ग्रुपमधील सभासदांनी मदतीसाठी साद दिली की सर्वात आधीत  प्रत्यक्ष त्यांना कोणत्या प्रकारची मदत हवी आहे खातर जमा केली जाते आणि तशी माहिती सभासदांना कळववली जाते. 

5/6

हेल्पिंग हँडची सुरुवात 2019 मध्ये झाली. या ग्रुपने कोल्हापूरातील पुरग्रस्तांना मदत केली. त्यानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये मुरबाड तालुक्यातील घोरले जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक मदत केली. 2021 मध्ये मुरबाडमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे घरांचं मोठं नुकसान झालं. ही घरं दुरुस्ती करण्याचं काम या ग्रुपने हाती घेतलं

6/6

2021 मध्ये महाड इथं पूरग्रस्तांना मदत केली. त्यानंतर 2021 मध्येच निळज धरणाची वाडी कोलाड इथं सौर ऊर्जा दिवे  आणि दिवाळी फराळ वाटप करण्यात आलं. हा मदतीचा ओघ कायम सुरुच आहे. आता 2024 रोजी वाघाची वाडी ग्रामपंचायत शाळा तालुका मुरबाड येथे शैक्षणिक मदत करण्यात आली.