बागी २ च्या ट्रेलर प्रदर्शनावेळी टायगर-दिशाची अनोखी केमिस्ट्री...

Feb 22, 2018, 16:22 PM IST
1/7

Tiger Shroff, Disha Patani at `Baaghi 2` Trailer Launch Photos

टायगर श्रॉफच्या बागी २ सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला. यापूर्वी हिरोपंती आणि बागी या सिनेमातून आपण टायगरची अॅक्शन पाहिली आहे. यावेळी टायगरने सांगितले की, लहानपणापासून अॅक्शन हिरो होण्याचे त्याचे स्वप्न होते.

2/7

Tiger Shroff, Disha Patani at `Baaghi 2` Trailer Launch Photos

Tiger Shroff, Disha Patani at `Baaghi 2` Trailer Launch Photos

बागी २ सिनेमाच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी टायगरचा अॅक्शनपॅक पाहायला मिळाला. यांसारख्या भूमिकांसाठी मी लहानपणापासूनच तयारी करत आहे, असे टायगरने सांगितले.

3/7

Tiger Shroff, Disha Patani at `Baaghi 2` Trailer Launch Photos

Tiger Shroff, Disha Patani at `Baaghi 2` Trailer Launch Photos

बागी २ च्या ट्रेलर प्रदर्शनावेळी टायगर आणि दिशाची क्यूट केमिस्‍ट्री पाहायला मिळाली. टायगर आणि दिशाच्या रिलेशनशीपची जोरदार चर्चा असली तरी दोघांनीही अजून त्याबद्दल कबुली दिलेली नाही.

4/7

Tiger Shroff, Disha Patani at `Baaghi 2` Trailer Launch Photos

Tiger Shroff, Disha Patani at `Baaghi 2` Trailer Launch Photos

यावेळी टायगर म्हणाला की, अॅक्शन हिरो होण्याचे माझे लहानपणापासूनचे स्वप्न आहे. ते खूप आव्हानात्मक आहे. मात्र माझी जिद्दी कायम आहे. याची तयारी मी लहानपणापासून करत आहे. सिनेमात अॅक्शन ट्रेनिंगसाठी मास्टर शिफजी यांनी खूप उत्तम सहकार्य केल्याने मी त्यांचे आभार मानतो.

5/7

Tiger Shroff, Disha Patani at `Baaghi 2` Trailer Launch Photos

Tiger Shroff, Disha Patani at `Baaghi 2` Trailer Launch Photos

ट्रेलर प्रदर्शनापूर्वी सिनेमाच्या टीमने दोन नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहेत. त्यात टायगर-दिशाची केमिस्‍ट्री दिसून येते.

6/7

Tiger Shroff, Disha Patani at `Baaghi 2` Trailer Launch Photos

Tiger Shroff, Disha Patani at `Baaghi 2` Trailer Launch Photos

येथे टायगर आणि दिशाव्यतिरिक्त दिग्दर्शक अहमद खान, निर्माता साजिद नाडियाडवाला देखील उपस्थित होते. सिनेमात प्रतीक बब्बर, मनोज बाजपेयी, रणदीप हुड्डा, दर्शन कुमार आणि दीपक डोबरियाल यांसारखे कलाकार देखील उपस्थित होते. बागी २ हा सिनेमा ३० मार्चला प्रदर्शित होईल.

7/7

Tiger Shroff, Disha Patani at `Baaghi 2` Trailer Launch Photos

Tiger Shroff, Disha Patani at `Baaghi 2` Trailer Launch Photos

बागी २ च्या निर्मात्यांनी बागी २ चा ट्रेलर मुंबईच्या रेसकोर्समध्ये अनोख्या अंदाजात प्रदर्शित केला. मुंबईच्या रेसकोर्सवर टायगर-दिशाची जोडी हेलीकॉप्टरमधून उतरली. (सर्व फोटो सौजन्य- IANS)