पेट्रोल प्रती लिटर ₹84.10, डिझेल... ; पाहा आज सर्वात स्वस्त आणि सर्वात महाग इंधन कुठं मिळतंय?

Petrol Diesel Price 27July 2023: मुसळधार पावसाचं निमित्त साधत तुम्ही लांबलचक सुट्टी घेत एखाद्या ठिकाणी जाणार असाल किंवा पावसाच्या या दिवसांमध्ये तुम्हाला चारचाकी वाहनंच सोयीची वाटत असतील तर, आधी पेट्रोल- डिझेलचे दर पाहून घ्या.   

Jul 27, 2023, 08:11 AM IST

Petrol Diesel Price 27July 2023: दर दिवशी सकाळी पेट्रोल आणि डिझेलदे दर निश्चित करून ते जाहीरही केले जातात. आजही इंधनाचे जर जाहीर करण्यात आले आहेत. पाहा तुमच्या शहरात काय आहेत दर... 

1/7

todays petrol Diesel prices latest update

Petrol Diesel Price 27July 2023: मुसळधार पावसाचं निमित्त साधत तुम्ही लांबलचक सुट्टी घेत एखाद्या ठिकाणी जाणार असाल किंवा पावसाच्या या दिवसांमध्ये तुम्हाला चारचाकी वाहनंच सोयीची वाटत असतील तर, आधी पेट्रोल- डिझेलचे दर पाहून घ्या.

2/7

आधी पाहा इंधनाचे दर

todays petrol Diesel prices latest update

 Petrol Diesel Price 27July 2023: कारण, कुठं हे दर वाढलेयत तर कुठं स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहेत.   

3/7

कच्च्या तेलाचे दर

todays petrol Diesel prices latest update

नुकत्याच जाहीर झालेल्या माहितीनुसार कच्च्या तेलाचे दर प्रती बॅरल 85 डॉलर इतके असूनही पेट्रोल आणि डिझेलचे दर मात्र स्थित आहेत असंच म्हणावं लागेल. 

4/7

सर्वात महागडं पेट्रोल...

todays petrol Diesel prices latest update

सध्याच्या घडीला देशात सर्वाधिक महाग पेट्रोल राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे विकलं जात असून, प्रती लिटरसाठी 113.48 रुपये मोजावे लागत आहेत. तर एक लिटर डिझेलसाठी 98.24 रुपये मोजावे लागत आहेत.   

5/7

सर्वाधिक महाग आणि स्वस्त इंधन कुठं?

todays petrol Diesel prices latest update

सर्वाधित स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये विकलं जात असून, इथं एका लिटरसाठी 84.10 रुपये आणि डिझेलसाठी 79.74 रुपये मोजावे लागत आहेत. इंधनाच्या दरात मोठा दिलासा असला तरीही राजस्थान, मध्य प्रदेश आणि ओडिशा येथे पेट्रोल प्रती लिटर 100 रुपयांच्या वर विकलं जात आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, पंजाब या राज्यांचाही यात समावेश आहे.   

6/7

महत्त्वाच्या शहरांमध्ये इंधनाचे दर

todays petrol Diesel prices latest update

देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये इंधनाचे दर पाहिल्यास पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 प्रति लिटर, मुंबईमध्ये 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रती लिटर, जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लीटर, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल  94.24 रुपये प्रती लिटर इतक्या दरानं विकलं जात आहे. 

7/7

घरबसल्या पाहा इंधनाचे दर

todays petrol Diesel prices latest update

घरबसल्या इंधनाचे दर तपासण्यासाठी तुम्ही HPCL चे ग्राहक असाल तर, HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवा. इंडियन ऑईलचे ग्राहक असल्यास RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवा आणि बीपीसीएल (BPCL) चे ग्राहक असाल तर,  <डीलर कोड>  लिहून 9223112222 या क्रमांकावर पाठवा.