Top 10 female Actresses of India : 'या' अभिनेत्रीने आलिया भट्ट-दीपिका टाकले  मागे, नाव पाहून त्यासुद्धा हडबडतील

कासवगतीने येऊन बाजी मारणारी ती कोण?  

Dec 26, 2022, 16:32 PM IST

Most popular female film stars in India : बॉलिवूडमध्ये नेहमीच तीव्र स्पर्धा पाहायला मिळते. पण हल्ली साऊथ चित्रपट आणि बॉलिवूड चित्रपट नेहमीच चर्चेत असतात. साऊथचे सेलिब्रिटी स्वत:चे नशीब चमकवण्यासाठी बॉलिवूडमध्ये आले होते. पण त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तुम्हाला माहितेय का  साऊथमधील एका अभिनेत्रीने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांचा पराभव केला आहे.  IMBD च्या टॉप-10 सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत 9 चित्रपट दक्षिणेतील होते, तर फक्त एक बॉलिवूड चित्रपट 'द काश्मीर फाइल्स'ला स्थान मिळू शकले. आता आणखी एक यादी समोर आली आहे, ज्यामध्ये साऊथमधील एका अभिनेत्रीने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफला पराभूत केले आहे. 

 

1/6

most popular female stars in india 2022, Marathi Bollywood News, Breaking News Today Entertainment

Ormax ने नोव्हेंबर महिन्यासाठी 'भारतातील सर्वात लोकप्रिय महिला फिल्म स्टार्स' ची  'Most popular female film stars in India' यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने प्रथम क्रमांक मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या यादीत सामंथा रुथ प्रभू पहिल्या, आलिया भट्ट दुसऱ्या, दीपिका पदुकोण पाचव्या आणि कतरिना कैफ आठव्या क्रमांकावर आहे. 

2/6

most popular female stars in india 2022, Marathi Bollywood News, Breaking News Today Entertainment

आलिया भट्ट तिच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे खूप चर्चेत असताना ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटासाठी आलियाच्या अभिनयाचेही कौतुक झाले, तरीही तिला या यादीत पहिले स्थान मिळू शकले नाही.   

3/6

most popular female stars in india 2022, Marathi Bollywood News, Breaking News Today Entertainment

दीपिका पदुकोण गेल्या काही महिन्यांपासून तिच्या ‘पठाण’ या बहुप्रतिक्षित चित्रपटामुळे चर्चेत आहे, कारण या चित्रपटात ती चित्रपट सुपरस्टार शाहरुख खानसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पण तरीही ती यादीत खूप मागे राहिली.   

4/6

Most popular female film stars in India actress leaves Alia Bhatt Deepika behind Samantha Ruth Prabhu nz

गेल्या काही महिन्यांपासून तिच्या बहुप्रतिक्षित 'टायगर 3' चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेली कतरिना कैफनेही या यादीत 8 व्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे, तर ती पुन्हा या चित्रपटासाठी सुपरस्टार सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तो मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असून याविषयी लोकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.  

5/6

Most popular female film stars in India actress leaves Alia Bhatt Deepika behind Samantha Ruth Prabhu nz

काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेला 'यशोदा' या चित्रपटातून समांथाला बॉलिवूडमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तिच्या दमदार अभिनयामुळे तिचे सर्वत्र कौतूक होत आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.  समंथा मायोसिटिस नावाच्या आजाराने त्रस्त आहे, त्यामुळे तिने कामातूनही ब्रेक घेतला आहे.         

6/6

Most popular female film stars in India actress leaves Alia Bhatt Deepika behind Samantha Ruth Prabhu nz

Most popular female film stars in India actress leaves Alia Bhatt Deepika behind Samantha Ruth Prabhu nz

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या आजारामुळे अनेक मोठे प्रोजेक्ट्सही समंथाच्या हातातून गेले आहेत. वैद्यकीय समस्यांमुळे तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बॉलिवूडमध्ये बनत असलेल्या 'खुशी' आणि 'सिटाडेल' या साऊथ चित्रपटांच्या हिंदी व्हर्जनमध्ये समंथा दिसणार नाही आहे. तिच्या त्या आजारामुळे अनेक चित्रपटांच्या संधीना तिला गमवाव्या लागत आहे.