Top 5 Budget Scooters: बाईकला टक्कर देणाऱ्या Scooters; जबरदस्त पावर, मायलेज इतका की पेट्रोल संपता संपणार नाही

Top 5 Budget Scooters: सध्या ऑटोमॅटिक गाड्यांना पसंती दिली जात असताना बाईकच्या तुलनेच स्कूटरच्या (Scooters) मागणीतही वाढ होत आहे. जर तुम्हीही स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर होंडा (Honda), टीव्हीएस (TVS), यमाहा (Yamaha), अॅक्टिव्हा (Activa) या कंपन्यांचे चांगले मॉडेल बाजारात उपलब्ध असून त्यांना प्रचंड मागणी आहे. स्कूटरमधील टॉप 5 मॉडेल्स (Top 5 Budget Scooters) कोणते आहेत, तसंच त्यांचे फिचर्स (Features) आणि किंमती काय आहेत हे जाणून घ्या.   

Mar 11, 2023, 19:14 PM IST
1/5

Honda activa 125: स्कूटर घ्यायची म्हटलं तर होंडाची अॅक्टिव्हा ही सर्वांचीच पहिली पसंती असते. अॅक्टिव्हा हा एक ब्रँडच झाला असून फक्त नावावर ही स्कूटर विकली जाते. मार्केटमध्ये सध्या अॅक्टिव्हा 125 सीसी डिलक्स उपलब्ध असून 86 हजार 715 रुपये (Ex Showroom) इतकी किंमत आहे. कंपनीने नुकतंच आपल्या डिलक्स मॉडेलमध्ये काही बदल केले आहेत. यामध्ये अनेक नवे फिचर्स देण्यात आले आहेत.   

2/5

TVS Jupiter 125: बजेटमधील स्कूटरची चर्चा असताना त्यात ज्युपिटरचा उल्लेख झाला नाही असं होणार नाही. याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 89 हजार 625 इतकी आहे. याआधी कंपनीने 110 सीसी इंजिनमधील स्कूटर आणली होती. आता कंपनीने अपग्रेड केलं असून 125 सीसी इंजिनची स्कूटर आणली आहे. यामधून 8.04 बीएचपीची पावर आणि 10.5 एनएनचं टॉर्क जनरेट करतं.   

3/5

Suzuki Access 125: होंडा अॅक्टिव्हानंतर सुझुकी अॅक्सेसला ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. अॅक्सेसचा टॉप व्हेरियंट 87 हजार 500 रुपये इतकी आहे. यामध्ये डिजिटल डिस्प्लेसह ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन, मोबाइल चार्जिंग पोर्ट असे अनेक फिचर्स उपलब्ध आहेत.   

4/5

Yamaha Fascino: यामाहा फसिनो आपल्या ट्रेंडी आणि क्यूट लूकमुळे कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणांमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. 125 सीसी स्कूटरमधील याचं इंजिन 8.04 बीएचपी पावर आणि 10.3 एनएमचा टार्क जनरेट करतं. किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास 88 हजार 230 रुपये इतकी आहे. स्कूटरमध्ये एलईडी लाईट, स्मार्ट मोटर जनरेटर, सायलेंट स्टार्ट, साइट स्टँड इंजिन कट ऑफ आणि ब्ल्यूटूथसारखे फिचर्स उपलब्ध आहेत.   

5/5

Hero Destini 125 Xtec: हिरोची डेस्टिनी स्कूटर आपल्या लूकमुळे तरुणांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. स्कूटरमध्ये 125 सीसीचं सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिन आहे जे 9 बीएचपीची पॉवर आणि 10 एनएमचा टार्क जनरेट करतं. स्कूटरच्या एलॉय व्हील व्हेरियंटची किंमत 86 हजार 23 रुपये इतकी आहे. स्कूटरमध्ये एलईडी लाईट, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल कंसोलसारखे फिचर्स आहेत. तसंच फोन चार्ज करण्यासाठी युएसबी पोर्टही मिळतं.