खरीखुरी तारेवरची कसरत करणारा मराठमोळा अवलिया...

Jul 18, 2019, 13:58 PM IST
1/9

खरीखुरी तारेवरची कसरत करणारा मराठमोळा अवलिया...

सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : ‘तुफानी....’ हा एक शब्द आणि त्यामध्ये असणारी ताकद कधी, काय करायला भाग पाडेल याचा खरंतर काही नेम नाही. पण, ही तुफानी करतेवेळी आमच्या तरुणाईला त्याचा परिणाम काय असेल याचं भानही असतं बरं. काहीतरी वेगळं करायचंय असं म्हणत हे ‘वेगळं’ नेमकं काय असतं? असा प्रश्न विचारल्यावर जेव्हा या ‘तुफानी’ची त्याला जोड मिळते ना, तेव्हा या वेगळेपणाचं महत्त्वं खऱ्या अर्थाने उंचावतं. ही उंची गाठली आहे ये अलिबागच्या/ लोणावळ्याच्या रोहित वर्तक या मित्रानं. रोहित हा खऱ्या अर्थानं त्याच्या आयुष्यात तुफानी करतो. कारण तो आहे देशातील पहिला हायलायनर. डोंगर चढणं आणि ते उतरणं ज्याला सहसा आपण ट्रेकिंग म्हणतो त्याचं थोडं साहसी व्हर्जन सादर करण्याला रोहितचं प्राधान्य असतं. (सर्व छायाचित्रे सौजन्य- रोहित वर्तक) 

2/9

खरीखुरी तारेवरची कसरत करणारा मराठमोळा अवलिया...

दोन डोंगरांच्या मध्ये असणारी खोल दरी पाहून तुमच्याआमच्यासारखे एक पाऊल मागेच येतात. पण, रोहित मात्र ही दरी ओलांडत एक नव्हे, तर कित्येक पावलं पुढे जातो आणि पाहणाऱ्यांना अवाक् करतो. डोंगर चढतानाही त्याचा अंदाज बरं. साहसाच्या या खेळात त्याला साथ मिळते ती म्हणजे गणेश गीध या त्याच्या मित्राची. ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ वगैरे वगैरेची वचनं ‘जय- वीरु’ने ज्याप्रमाणे बुलेटवर बसून दिली, त्याचप्रमाणे आवडीनिवडींची साथसंगत घेत या दोस्तीच्याच बळावर आणि विश्वासावर गणेश आणि रोहित एकेमकांच्या साथीनं कठिणातले- कठिण डोंगर सुळके मोठ्या धीरानं चढत आहेत. यात त्यांची एकमेकांना असणारी साथ पाहता हे डोंगरवेडे जय – वीरुच की, असं म्हणाला हरकत नाही. (सर्व छायाचित्रे सौजन्य- रोहित वर्तक) 

3/9

खरीखुरी तारेवरची कसरत करणारा मराठमोळा अवलिया...

रोहितविषयी सांगावं तर, उंची आणि कोणत्याही गोष्टीचा तोल यालाच तो नेहमी प्राधान्य देतो. ‘बाबु मोशाय़, .... लाईफ इज ऑल अबाऊट बॅलेन्सिंग एव्हरिथिंग.... अॅण्ड आय बिलिव्ह इन इट... 'आयुष्य म्हणजे सर्वच गोष्टींचा समतोल राखणं आणि  माझा यावरच विश्वास आहे', असं सांगणारा रोहित जेव्हा हायलाईन करण्यासाठी अधांतरी दोरीवर उभा राहतो तेव्हा, खरंच ते पाहताना आपला जीवही अधांतरी आलेला असतो. (सर्व छायाचित्रे सौजन्य- रोहित वर्तक) 

4/9

खरीखुरी तारेवरची कसरत करणारा मराठमोळा अवलिया...

आयुष्यावर नितांत प्रेम करणारा हा अवलिया याच आयुष्याला अगदी भरभरुन जगतो. नोकरी सांभाळून स्वत:च्या आवडीनिवडी जपण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणं काय असतं हे सांगताना त्याचं या क्षेत्रावर असणारं प्रेम हे अवघ्या काही शब्दांमध्ये मांडणं कठिणच. (सर्व छायाचित्रे सौजन्य- रोहित वर्तक) 

5/9

खरीखुरी तारेवरची कसरत करणारा मराठमोळा अवलिया...

पुढे जायचं असेल तर सध्याच्या घडीला धोका पत्करा असं कितीही म्हटलं तरीही हा धोका पत्करताना आपण दोनदा नव्हे... तर दहादा विचार करतो. पण, रोहित मात्र याच धोक्यावर विश्वास ठेवत निर्धास्तपणे या अधांतरी वाटांवर चालत सुटतो. (सर्व छायाचित्रे सौजन्य- रोहित वर्तक)   

6/9

खरीखुरी तारेवरची कसरत करणारा मराठमोळा अवलिया...

विश्वास, समतोल यांच्या बळावर त्याने आजवर बऱ्याच ठिकाणी हायलायनिंग केलं आहे. काही ठिकाणी या चौकटीबाहेरच्या साहसाचं प्रतिनिधीत्वंही केलं आहे.  (सर्व छायाचित्रे सौजन्य- रोहित वर्तक) 

7/9

खरीखुरी तारेवरची कसरत करणारा मराठमोळा अवलिया...

डीन पॉटर याचे युट्यूब व्हिडिओ पाहून त्याने ही अफलातून कला शिकली आणि आता या क्षेत्रात काहीतरी उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी आणि देशाचं नाव उंचावण्यासाठी म्हणून तो प्रयत्नशील आहे. (सर्व छायाचित्रे सौजन्य- रोहित वर्तक) 

8/9

खरीखुरी तारेवरची कसरत करणारा मराठमोळा अवलिया...

फक्त स्लॅकलायनिंग आणि हायलायनिंगच नव्हे, तर रॉक क्लाइंबिंगसाठीसुद्धा तो आणि त्याचा मित्र असे काही धाडसी निर्णय घेत आहेत जे पाहता, ‘अरे हे अफलातून आहे.....’ अशीच उत्सफुर्त प्रतिक्रिया तुमच्या आमच्यासारख्यांच्या तोंडातून बाहेर पडते. (सर्व छायाचित्रे सौजन्य- रोहित वर्तक)   

9/9

खरीखुरी तारेवरची कसरत करणारा मराठमोळा अवलिया...

फक्त छंद म्हणून नव्हे, तर मदत म्हणूनही तो या कौशल्याचा वापर करतो. गड किल्ल्यांच्या वाटांवर निघालेल्या ट्रेकर्सना अडचणीच्या वेळी तो ‘शिवदुर्ग’ या ग्रुपसोबत मदतीसाठीही पुढे सरसावतो. त्यामुळं खऱ्या अर्थानं तारेवरची कसरत करणाऱ्या आवलियाला हॅट्स ऑफच म्हणावं लागेल.... (सर्व छायाचित्रे सौजन्य- रोहित वर्तक)