'तुझ्यात जीव रंगला' म्हणत जाऊबाई भेटल्या; धनश्री-अक्षयाची 'या' निमित्ताने खास भेट

जाऊबाई जोरात..... 

| Mar 09, 2021, 15:59 PM IST

मुंबई : झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) मालिकेतील जावा-जावा म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashree Kadgaonkar) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) जवळपास वर्षानंतर एकमेकींना भेटल्या आहेत. या मालिकेतील दोघींची पात्र प्रेक्षकांनी पसंत केली. धनश्री काडगावकरने गायकवाड कुटुंबियांच्या मोठ्या सुनेची  म्हणजे नंदिनी वहिनीची भूमिका साकारली तर अक्षया देवधर ही लहान सूनेची भूमिका म्हणजे अंजली बाईंची भूमिका साकारली. 

 

1/5

या दोघी आता तब्बल एका वर्षांनी भेटल्या आहेत. धनश्रीने काही महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला. याच बाळाला भेटण्यासाठी त्याची लाडकी मावशी आली आहे. धनश्रीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  

2/5

अक्षया देवधरने धनश्री काडगावकरला खास गिफ्ट दिलं आहे. PNG ज्वेलर्समधून अक्षयाने धनश्रीला खास गिफ्ट दिलं आहे. 

3/5

हे गिफ्ट आहे सुंदरसा नेकलेस... यामध्ये कानातलं आणि गळ्यातली सुंदर नेक्लेस आहे. 

4/5

अक्षया यावेळी धनश्रीसोबत डिंकाचे लाडू खाताना दिसत आहे. 

5/5

अक्षयाने धनश्रीच्या बाळाला हातात घेऊन ती क्यूट स्माईल देत आहे.