अमेरिकेत Aliens चे बॉडी पार्ट्स आणि UFO; माजी लष्करी अधिकाऱ्यांचा खळबळजनक दावा
पृथ्वीतलावर मानवाव्यतिरिक्त एलियन्स देखील अस्तित्वात आहेत का? याचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही त्यातच अमेरिकेच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांनी एलियन्सबाबत केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
UFO Hearing : पर ग्रहावरील सजीव अर्थात Aliens खरचं अस्तित्वात आहेत की नाही याबाबत अद्यापही काही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. अशातच अमेरिकेच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांनी खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकेत Aliens तसेच Aliens बॉडी पार्ट्स आणि UFO अस्तित्वात असल्याचा दावा करण्यात आला आहे. 26 जुलै 2023 रोजी राष्ट्रीय सुरक्षा उपसमितीची अत्यंत महत्वाची बैठक पार पडली. यावेळी Aliens च्या अस्तित्वाबाबत चर्चा करण्यात आली.