क्रिकेटच्या मैदानात उतरली काका-पुतण्याची जोडी; पण विरोधात नाही तर एकत्र खेळले, पण शेवटी....

नूर अली जारदान हा इब्राहिमचा काका आहे. त्याने नुकताच टेस्ट डेब्यू केला आहे. इब्राहिमनेच त्यांना टेस्ट कॅप दिली.   

Feb 28, 2024, 16:02 PM IST
1/9

अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात एकमात्र कसोटी सामन्याला आजपासून अबुधाबीत सुरुवात झाली आहे.   

2/9

या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.   

3/9

या सामन्यात अफगाणिस्तान संघाने रहमानुल्लाह गुरबाजला संधी दिली. यासह त्याने कसोटी संघाच डेब्यू केला.   

4/9

गुरबाजने अफगाणिस्तान संघाकडून 38 एकदिवसीय सामने आणि 52 टी-20 सामने खेळले आहेत. तिथे त्याने अनुक्रमे 1295 आणि 1367 धावा केल्या आहेत.   

5/9

दरम्यान गुरबाजने 24 टी-20 सामन्यात 31 विकेट्स मिळवल्या आहेत. तसंच तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो.   

6/9

दरम्यान या सामन्यात आणखी एक अजब गोष्ट पाहण्यास मिळाली. या सामन्यात 22 वर्षीय इब्राहिम जादरान आणि 35 वर्षीय नूर अली जादराने ओपनिंग केली.   

7/9

नूर अली जारदान हा इब्राहिमचा काका आहे. त्याने नुकताच टेस्ट डेब्यू केला आहे. इब्राहिमनेच त्यांना टेस्ट कॅप दिली.   

8/9

आज खेळला गेलेला सामना त्याचा दुसरा कसोटी सामना होता. पण तो फक्त 7 धावांवर बाद झाला. याआधी तो दुसऱ्या प्रकारातही खेळला आहे. त्याने 51 एकदिवीस यामन्यांमध्ये 1216 आणि 23 टी-20 सामन्यात 597 धावा केल्या आहेत.   

9/9

दुसरीकडे इब्राहिमने भारताविरोधातील टी-20 मालिकेत संघाचं नेतृत्व केलं होतं. इब्राहिम 6 कसोटी, 31 एकदिवसीय आणि 33 टी-20 सामने खेळले आहेत.