7th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

पगारात वाढ होण्याची शक्यता

Dec 04, 2020, 10:37 AM IST

केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याच्या दिशेने पाऊल उचलताना दिसत आहे. याचा फायदा क्रेंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. सरकार या बातमीची घोषणा महिन्याच्या शेवटी करणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

1/5

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार वाढ

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार वाढ

सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याच्या विचारात आहे. सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यास जवळपास ५० लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे.   

2/5

२१ हजार रूपयांपर्यंत होईल पगार वाढ

२१ हजार रूपयांपर्यंत होईल पगार वाढ

पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याची शक्यता मोदी सरकारने वर्तवली आहे. सातव्या वेतन आयोगांतर्गत भारतीय रेल्वेच्या विना-राजपत्रित किंवा विना राजपत्रित वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात २१ हजार रूपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

3/5

रेल्वे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं होणार प्रमोशन

रेल्वे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं होणार प्रमोशन

अखिल भारतीय रेल्वे पुरुष फेडरेशनच्या म्हणण्यानुसार कर्मचारी बर्‍याच काळापासून प्रमोशनची मागणी करत होते. त्यामुळे लवकरच सातवे वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचे प्रमोशनही होण्याची शक्यता आहे. 

4/5

२५ हजार रूपयांपर्यंत होईल पगार वाढ

२५ हजार रूपयांपर्यंत होईल पगार वाढ

मीडिया रिपोर्टनुसार भारतीय रेल्वेच्या विना-राजपत्रित किंवा विना राजपत्रित वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. त्यांचे एचआरए, डीए आणि टीए देखील वाढू शकतात.  

5/5

पगार वाढीसाठी रेल्वेकडून मंजुरी

पगार वाढीसाठी रेल्वेकडून मंजुरी

प्रयोगशाळेतील कर्मचारी, आरोग्य व मलेरिया इन्स्पेक्टर, स्टाफ नर्स, फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, फार्मासिस्ट, डायटिशियन आणि कुटुंब कल्याण संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.