मनू भाकरच्या माहित नसलेल्या 8 गोष्टी आणि Unseen Photos
मनू भाकरे कोण आहे आणि तिच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी आणि फोटो
मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि यासह या स्पर्धेत भारताचे पदकासाठीचे खाते उघडले. तीन वर्षांपूर्वी टोकियोमधील तिच्या ऑलिम्पिक पदार्पणात निराशाजनक कामगिरीनंतर अश्रू ढाळणाऱ्या भाकरने आता तिच्या आधीच प्रभावी कामगिरीच्या यादीत दोन ऑलिम्पिक कांस्यपदकांची भर घातली आहे. वयाच्या 16 व्या वर्षी मनू भाकरने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. सध्या ती पंजाब विद्यापीठातून लोक प्रशासनात पदवी घेत आहे. येथे जाणून घ्या ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय खेळाडू मनू भाकरेबद्दलच्या माहित नसलेल्या गोष्टी