Urvashi Rautela च्या डेटिंग लिस्टमध्ये फक्त क्रिकेटर्स नाही तर Ambani कुटुंबातील 'या' सदस्याचे नाव!

Urvashi Rautela Birthday : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्वशी ही 25 फेब्रुवारी रोजी 29 वा वाढदिवस आहे. (Urvashi Rautela birthday) उर्वशीचं नाव आजवर अनेक क्रिकेटरांसोबत जोडण्यात आलं आहे. त्यात क्रिकेटर ऋषभ पंतसोबत तिच्या रिलेशनशिपची चर्चा तर गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. दरम्यान, तिच्या डेटिंग लिस्टमध्ये अंबानी कुटुंबातील एका सदस्याचे देखील नाव आहे. आज तिच्या डेटिंग लाइफविषयी थोडं जाणून घेऊया... (Urvashi Rautela dating life)

Feb 25, 2023, 12:31 PM IST
1/5

Urvashi Rautela dating life

उर्वशीने एका मुलाखती दरम्यान खुलासा केला होता की मिस्टर आरपी तिच्या हॉटेलच्या लॉबीमध्ये तिची प्रतिक्षा करत थांबला होता. इतकंच काय तर तिला 17 मिस्ड कॉल देखील होते. त्यानंतर उर्वशीसोबत ऋषभ पंतचं नाव जोडण्यात आलं होतं. त्यानंतर ऋषभ पंतनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दीदी, खोटं बोलू नका असे म्हटले. मग काय ऋषभ पंत जिथे असेल तिथे उर्वशी पोहोचायची... (Rishabh Pant)

2/5

Urvashi Rautela dating life

2018 साली उर्वशी आणि हार्दिक पांड्याचे (Hardik pandya) नाव जोडण्यात आले होते. त्याचे कारण म्हणजे आयपीएल दरम्यान त्या दोघांची भेट झाली होती. तर, ते दोघं बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होते अशा चर्चा देखील सुरु होत्या. त्यानंतर अचानक एक बातमी समोर आली की हार्दिक पांड्यानं नताशासोबत साखरपूडा केला आहे. 

3/5

Urvashi Rautela dating life

हार्दिक आधी 2015 मध्ये उर्वशी रौतेलाचे नाव आकाश अंबानीसोबत (Akash Ambani) जोडण्यात आले होते. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्या दोघांना हे सगळ्यांपासून लपवून ठेवायचे होते असे म्हटले जात होते. मात्र, आकाश अंबानीनं श्लोका अंबानीशी लग्न केलं. 

4/5

Urvashi Rautela dating life

उर्वशी रौतेला आणि चंकी पांडेचा पुतण्या (Chunky Panday) अहान पांडे (Ahaan Panday) हे डिनर डेटवर जाण्यास सुरुवात केल्याचे म्हटले जाते. दोघंही इतक्यावेळा एकत्र दिसले की त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, त्या दोघांनी या बातमीला दुजोरा दिला नाही किंवा त्याला नकारही दिला नाही. 

5/5

Urvashi Rautela dating life

जेव्हा उर्वशीनं मिस्टर आरपी असं नाव एका मुलाखतीत घेतले होते, तेव्हा तिच्या आयुष्यातील मिस्टर आरपी कोण आहे असा प्रश्न सगळ्यांना आला होता. त्यानंतर उर्वशीनं राम पोथीनेनीसोबत (Ram Pothineni) एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, नंतर अशी बातमी समोर आली की ते दोघे लवकरच एका चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत.