Vastu Tips: पाकिटात 'या' वस्तू चुकूनही ठेवू नका; नाहीतर एकही पैसा उरणार नाही कारण...

आपल्या सर्वांना कायम असेच वाटत राहते की देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहावी तेव्हा त्यासाठी आपण कायमच प्रयत्न करत असतो. आपल्या खर्चावर आपले नियंत्रण ्अनेकदा राहत नाही परंतु ते आपल्या हातातही नाही. अशावेळी अनेक उपाय करण्याचे आपण प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. तेव्हा या नव्या वर्षात आपण जाणून घेऊया की आपल्या पैशांच्या वॉलेटमध्ये कोणत्या गोष्टी न ठेवल्यानं देवी लक्ष्मीची कृपा राहील. 

Dec 07, 2022, 19:24 PM IST

Vastu Tips: आपल्या सर्वांना कायम असेच वाटत राहते की देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहावी तेव्हा त्यासाठी आपण कायमच प्रयत्न करत असतो. आपल्या खर्चावर आपले नियंत्रण ्अनेकदा राहत नाही परंतु ते आपल्या हातातही नाही. अशावेळी अनेक उपाय करण्याचे आपण प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. तेव्हा या नव्या वर्षात आपण जाणून घेऊया की आपल्या पैशांच्या वॉलेटमध्ये कोणत्या गोष्टी न ठेवल्यानं देवी लक्ष्मीची कृपा राहील. 

1/4

या गोष्टी ठेवू नका

astro tips put these thing in your wallet and please god laxmi know more

वास्तु तज्ज्ञ सांगतात की फाटलेल्या नोटा कधीही पर्समध्ये ठेवू नयेत तसेच टाकाऊ कागद किंवा ब्लेड वगैरे ठेवू नका. असे केल्याने लक्ष्मी देवी कोपते आणि घरात धनाची कमतरता भासते. असे म्हणतात की पर्समध्ये मृत व्यक्तीचा फोटो कधीही ठेवू नये. ते तुम्हाला कितीही प्रिय असले तरी असे केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते.  

2/4

पर्समध्ये लक्ष्मीजींचा बसलेला फोटो लावा

astro tips put these thing in your wallet and please god laxmi know more

वास्तूनुसार देवी लक्ष्मीचा बसलेला फोटो पर्समध्ये ठेवल्यानेही फायदा होतो. हा उपाय केल्याने व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते. पर्समध्ये लक्ष्मीजींचा बसलेला फोटो ठेवल्याने धनाची देवी कायम वास करते आणि कुठेही जात नाही. 

3/4

पर्समध्ये तांदळाचे काही दाणे ठेवा

astro tips put these thing in your wallet and please god laxmi know more

वास्तूच्या नियमानुसार लाल रंगाच्या कागदावर तुमची इच्छा लिहा आणि रेशमी धाग्याने बांधा. यानंतर देवी लक्ष्मीचे स्मरण करताना ते पर्समध्ये ठेवा. यामुळे लक्ष्मीची कृपा वर्षभर राहील. याशिवाय खर्चामुळे खिसा रिकामा झाला असेल तर पर्समध्ये तांदळाचे काही दाणे ठेवा. यामुळे अनावश्यक खर्चापासून आराम मिळेल. हिंदू धर्मात तांदूळ अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे घरात धनसंपत्ती वाढते.

4/4

सोन्याचे किंवा चांदीचे नाणे ठेवा

astro tips put these thing in your wallet and please god laxmi know more

नवीन वर्षात लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळावा यासाठी वास्तुशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या पर्समध्ये ठेवल्याने देवी लक्ष्मी कृपा करते. नवीन वर्षात तुमच्या पर्समध्ये नवीन सोन्याचे किंवा चांदीचे नाणे ठेवा. प्रथम हे नाणे माँ लक्ष्मीच्या चरणांना स्पर्श करून घ्या आणि नंतर ते पर्समध्ये ठेवा. यामुळे धनाची देवता प्रसन्न होईल आणि व्यक्तीच्या प्रगतीचे सर्व मार्ग खुले होतील.   (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)