AC मुळे ऑफीस आणि घरात पसरतोय कोरोना, सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

| May 21, 2021, 19:53 PM IST
1/6

विजय राघवन यांच्या कार्यालयाने म्हटले की, खुल्या घरांमध्ये संसर्ग होण्याचा धोका कमी असतो. त्यामुले घरे, कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी हवा खेळती राहिली पाहिजे अशा प्रकारे नियोजन करावे लागणार आहे.

2/6

व्हेटिलेशनमुळे एखाद्या व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे कोरोना पसरण्याचा धोका कमी होतो.

3/6

बंद खोलीत कोरोनाचा धोका

बंद खोलीत कोरोनाचा धोका

ज्या खोलीत एसीमुळे खिडक्या आणि दारे बंद आहेत त्या खोलीत संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. बाहेरील हवेला बंद खोलीत येण्याची जागा नसेल तर संक्रमित हवा खोलीच्या आतच राहते.

4/6

AC मुळे कोरोनाचा धोका अधिक

AC मुळे कोरोनाचा धोका अधिक

कोरोना संक्रमित व्यक्ती जर एखाद्या खोलीत किंवा इतर लोकांमध्ये असलेल्या खोलीत बसली असेल तर. अशा खोल्यांमध्ये हवा बाहेर पडण्यासाठी जागा नसते, परंतु एसीच्या मदतीने ती खोलीत फिरत राहते. अशा परिस्थितीत, संक्रमित व्यक्तीच्या तोंडातून आणि नाकामधून बाहेर पडलेले थेंब आणि एरोसोल खोलीतच राहतात आणि ते इतरांना संक्रमित करतात.

5/6

सरकार असे म्हणते की ड्रॉपलेट्स आणि एरोसोलच्या माध्यमातून विषाणूंचा जास्त प्रसार होतो. ड्रॉपलेट्स 2 मीटर पर्यंत तर एरोसोल 10 मीटरपर्यंत हवेमध्ये राहतात. मानवी ड्रॉपलेट्स खोकला, थुंकणे किंवा बोलताना बाहेर पडतात.

6/6

प्रधान वैज्ञानिक सल्लागार यांनी जारी केलेल्या गाईडलाईन्स असे म्हटले आहे की, पंख्याची हवा, खुली दारे आणि खुल्या खिडक्या हवेची गुणवत्ता सुधारू शकतात आणि कोरोनाचा धोका कमी करू शकतात.