एकाच राशीत आधी शुक्र गोचर आणि नंतर शुक्र वक्री, 30 दिवस 'या' राशींची चांदी

Venus transit : कुंडलीतील शुक्र हा शुभ स्थानी असेल तर त्या जाचकच्या आयुष्यात कसलीही कमतरता भासत नाही. तो दिवसरात्र पैशांमध्ये खेळतो आणि आयुष्यात आनंद राहतो.   

Jun 06, 2023, 08:45 AM IST

Shukra Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला अतिशय महत्त्व आहे. ग्रहांच्या स्थितीचा मानवी आयुष्यावर शुभ किंवा अशुभ परिणाम होतो असं मानतात. प्रत्येक ग्रह आपल्या आयुष्यात महत्त्वाचा असतो. शास्त्रानुसार शुक्र ग्रह हा संपत्तीचा कारक मानला जातो. शुक्र ग्रह एकाच राशीत गोचर करणार आहे. त्यानंतर त्याच राशीत शुक्र वक्री होणार आहे. (venus transit retrograde in Cancer these zodiac signs get lot of money for 30 days Shukra Gochar 2023 )

1/9

कधी बदलणार शुक्राची स्थिती?

शुक्र पुढील महिन्यात 7 जुलै 2023 ला सकाळी 3.59 वाजता कर्क राशीतून सिंह राशीत संक्रमण करणार आहे. त्यानंतर 23 जुलै 2023  सकाळी 6:01 वाजता शुक्र मागे जाईल आणि 7 जुलै 2023 ला सकाळी पुन्हा कर्क राशीत परतणार आहे. त्यानंतर शुक्र कर्क राशीत 4 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. 

2/9

30 दिवस 'या' राशींची चांदी

शुक्र ग्रहाचा बदल काही राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. जुलै ते ऑगस्ट हा एक महिना या राशीच्या लोकांची चांदी होणार आहे.   

3/9

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी शुक्राची स्थिती नातेसंबंध मजबूत करणारा ठरणार आहे. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात जोडीदाराची एन्ट्री होणार आहे. करिअरमध्ये उत्तुंग यश मिळणार आहे. 

4/9

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. वाहन खरेदीचा योग आहे. घरामध्ये शुभ कार्य ठरणार आहे. कार्यक्षेत्रात महिनाभर चांगला परिणाम दिसून येणार आहे. व्यवसायात फायदा होणार आहे. मालमत्तेशी संबंधित गोष्टीत काळजी घ्या.   

5/9

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचरचा महिनाभर प्रेमसंबंधासाठी रोमँटिक असणार आहे. कार्यक्षेत्रात वरिष्ठांची मदत मिळणार आहे. प्रवासातून आर्थिक फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. 

6/9

कर्क (Cancer)

शुक्र गोचरमुळे या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. गोड बोलून तुम्ही लोकांकडून काम करुन घेणार आहात. तुमचं बँक बॅलन्स मजबूत होणार आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. 

7/9

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात यश मिळणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. व्यवसात फायदा होणार आहे. जीवनात रोमान्सची एन्ट्री होणार आहे.   

8/9

कन्या (Virgo)

या काळ परदेशात नोकरी करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. स्वतःवर आणि छंदांवर तुम्ही खर्च करणार आहात. महिनाभर घरात आनंद असणार आहे. 

9/9

तूळ (Libra)

या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्यावर खुश असणार आहेत. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)