'कारभारी लयभारी' मध्ये दिसणार लक्ष्याची 'आवडी'
नव्या भूमिकेत दिसणार पूजा पवार
मुंबई : झपाटलेला सिनेमातील लक्ष्मीकांत बेर्डेची 'आवडी' म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री पूजा पवार छोट्या पडद्यावर दिसणार आहे. झी मराठीवरील 'कारभारी लयभारी' या मालिकेत आहे. या मालिकेत त्यांची नकारात्मक भूमिका आहे.
पूजा पवार यांनी लग्नानंतर ब्रेक घेतला होता. पण आता त्यांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. 'बापमाणूस' या मालिकेत रविंद्र मणकणी यांच्यासोबत मालिका केली आहे. आता पूजा पवार निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहेत.