PHOTO : 6 धाकड़ छोरी! बाद झालेल्या विनेशला नावं ठेवण्याआधी तिच्या कुटंबानं देशाला काय दिलं, एकदा वाचाच
Phogat Sisters : ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलचं स्वप्न 100 ग्रॅममुळे हुकलंय. फायनल मॅचपूर्वीच पात्रेसाठी करण्यात आलेल्या वजनमध्ये विनेश फोगाट हिचं वजन 100 ग्रॅम अधिक भरल्यामुळे ती अपात्र ठरलीय. पण बाद झालेल्या विनेशला नावं ठेवण्याआधी तिच्या कुटंबानं देशाला काय दिलं, एकदा वाचाच.
1/8
दुसरीकडे भारताचा फायनलमध्ये पोहोचणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती पण 100 ग्रॅम वजनामुळे हे स्वप्न अपूर्ण राहिलं. विशेष म्हणजे सेमीफायनलमध्ये आजपर्यंत न हरलेल्या गोल्ड मेडलिस्ट क्युबाला विनेशने धुळ चारलीय. विनेशसह त्याचा कुटुंबातील इतर बहिणींनीही भारतीयांची मान उंचावलीय. 'दंगल' चित्रपटात विनेश फोगाटचे काका आणि गुरू महावीर फोगाट यांची कहाणी दाखवण्यात आलीय. फोगाट यांना त्यांच्या प्रशिक्षणासाठी भारत सरकारने द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित केलंय.
2/8
फोगाट कुटुंबातील गीता, बबिता, प्रियांका, रितू, विनेश आणि संगीता या सगळ्या कस्तूपटू आहेत. त्यापैकी गीता, बबिता, रितू आणि संगीता या माजी कुस्तीपटू असून त्या प्रशिक्षक महावीर सिंग फोगाट यांच्या मुली आहेत. तर प्रियांका आणि विनेश यांचं संगोपन महावीर यांनी केलंय. वयाच्या 9व्या वर्षी विनेशच्या वडील राजपाल यांना गमावलं होतं. महावीर फोगाट हे विनेशाचे मोठा काका आहेत.
3/8
महावीर फोगाट यांनी त्यांच्या भिवानी जिल्ह्यातील बलाली गावात सर्व सहा बहिणींना कुस्तीचे बारकावे शिकवले. फोगाट बहिणींपैकी गीता, बबिता आणि विनेश या तीन भगिनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या वजनी गटात सुवर्णपदक विजेत्या असून प्रियांकाने आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकलंय. रितू राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक तर संगीताने वयोगट स्तरावरील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकलंय.
4/8
5/8
दोन वर्षांनंतर, गीता लंडन ऑलिम्पिक 2012 साठी 55 किलो गटात पात्र ठरणारी भारतातील पहिली महिला कुस्तीपटू ठरली. तिला 16 च्या फेरीत तीन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती टोन्या व्हर्बेककडून पराभव पत्करावा लागला आणि नंतर कांस्यपदकासाठी रिपेचेज फेरीत तिला पराभव पत्करावा लागला. काही महिन्यांनंतर, गीता फोगाटने 55 किलो गटात तिचं पहिलं जागतिक चॅम्पियनशिप पदक जिंकलं.
6/8
बबिता फोगाटनेही 51 किलो गटात कांस्यपदक जिंकलं. 2012 च्या महिला जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भारताने दोनच पदकं जिंकली होती. बबिता फोगटने 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 55 किलोमध्ये सुवर्णपदक जिंकलं आणि त्यानंतर 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 53 किलोमध्ये रौप्य पदकावर नाव कोरलं. तिने 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, मात्र ती एक व्यावसायिक कुस्तीपटू आहे.
7/8
गीता आणि बबिता यांच्या दोन्ही लहान बहिणी रितू आणि संगीता यांनीही अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलंय. रितू फोगाटने 2016 कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक आणि 2017 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकलं. त्यानंतर ती मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) कडे वळली. संगीता फोगाट ही सर्वात लहान बहीण कुस्तीपटू असून तिने काही स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलंय. तिने टोकियो 2020 कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाशी लग्न केलंय.
8/8