Virat Kohli Birthday : एक खराब ओव्हरनं टेस्ट टिममधून झालेला विराटचा पट्टा कट; मग कसं चमकलं नशीब?

Virat Kohli 35th Birthday : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा आज 35 वा वाढदिवस. विराट कोहली आज 5 नोव्हेंबर रोजी 35 वर्षांचा झाला आहे. विराट कोहलीचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात 5 नोव्हेंबर 1988 साली झाला. 

| Nov 05, 2023, 08:03 AM IST

Happy Birthday Virat Kohli : विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. आजचा सामना खूप खास आहे कारण भारतीय संघाचा सुपरस्टार खेळाडू विराट कोहली आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय संघ आपल्या माजी कर्णधाराला विजयाची भेट देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचबरोबर कोलकात्याच्या ईडन गार्डन्सनेही विराटला खास अनुभव देण्यासाठी तयारी केली आहे. स्टेडियमच्या लाईट शोमध्येही विराट कोहलीसाठी काहीतरी खास असणार आहे. एवढेच नाही तर विराट कोहलीसाठी खास केकही तयार केला जात आहे. जबरदस्त फॉर्मात असलेला विराट कोहली आजच्या सामन्यात शतक झळकावेल आणि शतकांच्या बाबतीत सचिन तेंडुलकरचीही बरोबरी करेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.

1/6

मध्यम वर्गातील कोहली असा झाला स्टार

Virat Kohli 35th Birthday Test Career Saved By MS Dhoni How Virat Kohli Become Test Team Star Cricketer

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा आज 35 वा वाढदिवस आहे. विराट कोहली आज म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी 35 वर्षांचा झाला. विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

2/6

धोनीच्या एका निर्णयाने बदललं आयुष्य

Virat Kohli 35th Birthday Test Career Saved By MS Dhoni How Virat Kohli Become Test Team Star Cricketer

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा आणि शतके झळकावणाऱ्या विराट कोहलीची कसोटी कारकीर्द माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीमुळे थोडक्यात बचावली. सिलेक्टर्स विराट कोहलीला टीम इंडियातून वगळणार होते, पण धोनीच्या एका निर्णयाने त्याचे करिअर वाचले.   

3/6

सिलेक्टर्सने विराटला वगळलं

Virat Kohli 35th Birthday Test Career Saved By MS Dhoni How Virat Kohli Become Test Team Star Cricketer

आपल्या कर्णधारपदाखाली महेंद्रसिंग धोनी संघातील खेळाडूंना खूप संधी देत ​​असे, मग तो रोहित शर्मा असो किंवा विराट कोहली. 2012 च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर त्याच्या खराब फॉर्ममुळे सिलेक्टर्सची विराट कोहलीला टीम इंडियातून वगळण्याची इच्छा होती, परंतु धोनीने विराट कोहलीवर विश्वास दाखवला आणि त्याला संघातच ठेवून घेतले.   

4/6

विरुकडून खुलासा

Virat Kohli 35th Birthday Test Career Saved By MS Dhoni How Virat Kohli Become Test Team Star Cricketer

टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने याचा खुलासा केला होता. 2012 मध्ये सिलेक्टर्सचा निर्णय असता तर कोहलीला भारताकडून कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नसती, असे सेहवागने म्हटले होते. ऑस्ट्रेलियातील काही खराब खेळीनंतर भारतीय सिलेक्टर्सनी कोहलीला वगळायचे होते. पहिल्या दोन कसोटीत कोहलीने केवळ 10.75 च्या सरासरीने धावा केल्या. सेहवाग त्या संघाचा उपकर्णधार होता आणि धोनी कर्णधार होता.

5/6

कोहलीच्या जागी हातो 'हा' खेळाडू

Virat Kohli 35th Birthday Test Career Saved By MS Dhoni How Virat Kohli Become Test Team Star Cricketer

वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, 2012 साली कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याने मिळून कोहलीची जागा वाचवली होती. सेहवाग म्हणाला, 'ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणार्‍या तिसऱ्या कसोटीत सिलेक्टर्सनी विराट कोहलीऐवजी रोहित शर्माला खेळवण्याचा निर्णय घेतला, पण त्याने आणि कर्णधार धोनीने मिळून निर्णय घेतला की ते कोहलीच खेळतील'.  

6/6

असा झाला धोनीचा कमबॅक

Virat Kohli 35th Birthday Test Career Saved By MS Dhoni How Virat Kohli Become Test Team Star Cricketer

सेहवाग पुढे म्हणाला, 'त्यावेळी मी संघाचा उपकर्णधार होतो आणि महेंद्रसिंग धोनी संघाचे नेतृत्व करत होता, आम्ही दोघांनी विराट कोहलीला पर्थ कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले आणि पुढे जे घडले ते इतिहास आहे. त्या सामन्यात कोहलीने पहिल्या डावात 44 आणि दुसऱ्या डावात 75 धावा केल्या होत्या. विराट कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 78 शतके आहेत. धोनीने आत्मविश्वास दाखवला नसता तर टीम इंडियाने हा महान खेळाडू गमावला असता.